Fitness 1 minute 7 steps keep you always young
फक्त काही मिनिटांसाठी करा ही कामं; आयुष्यभर टिकवाल तारूण्य By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 04:42 PM2019-10-17T16:42:37+5:302019-10-17T16:53:55+5:30Join usJoin usNext वेळीची कमतरता आणि कामाचा व्याप यांमुळे एका गोष्टीवर सर्वाधिक इफेक्ट होतो ते म्हणजे, आपलं आरोग्य. परंतु, अनेक अशा गोष्टी आहे. ज्या करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिनिटं लागतो आणि या नियमिपणे केल्याने आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. जाणून घेऊया अशा काही गोष्टींबाबत... सूर्याची किरणं व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण उन्हापासून दूर राहतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा एक मिनिटांचा वेळ मिळेल तेव्हा कोवळ्या उन्हात जाऊन बसा. जर असं तुम्ही तीन ते चार वेळा एक मिनिटासाठी केलं तर शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही. मोठा श्वास घ्या 8 ते 10 वेळा मोठा श्वास घ्या. मोठ्या श्वास घेण्यासाठी साधारणतः एक मिनिटं लागतो. परंतु, हा एक मिनिटं तुमचा स्ट्रेस दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच तुमच्या हार्ट रेट स्थिर राहण्यास मदत होते. स्वतःला मसाज द्या वेळेअभावी तुम्ही स्पा करण्यासाठी जाऊ शकत नाही. पण तुम्ही घरीच स्वतःला स्पा देऊ शकता किंवा काम करताना एक मिनिटांसाठी ब्रेक घ्या आणि आपल्या हातांनी स्वतःला मसाज द्या. स्ट्रेस कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतं. मेडिटेशन करा वेळ मिळताच तुम्ही एक मिनिटासाठी आपले डोळे बंद करून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. एक मिनिटांचं मेडिटेशन तुम्हाला एग्जायटी, फिजिकल पेन, स्ट्रेस इत्यादींमध्ये आराम देऊ शकतं. प्रोटीन डाएट तुम्हाला एक मिनिटांचा अवधी मिळेल तेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रोटीन इन्टेक घ्या. बदाम किंवा चणे खा. यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं. आपल्या जागेवरच धावा जर तुम्हाला नियमितपणे जॉगिंग करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही वेळ मिळेल तेव्हा जागेवरच धावू शकता. यामुळे तुमचं हृदय पंप करेल आणि ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी मदत मिळेल. डोळ्यांना आराम द्या एक मिनिटासाठी तुम्ही झोपू तर शकत नाही. पण आपल्या डोळ्यांना आराम मात्र नक्की देऊ शकता. त्यामुळे फक्त एका मिनिटासाठी आपल्या कम्प्युटर स्क्रिनवरून नजर हटवून डोळे बंद करा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो. असं 5 ते 6 वेळा करा. (टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.) टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सHealth TipsFitness Tips