five healthy fruits for diabetes patient
'ही' फळं खा अन् मधुमेह नियंत्रणात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 11:02 PM2020-01-27T23:02:12+5:302020-01-27T23:05:22+5:30Join usJoin usNext जगातील तब्बल ४० कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेहींना कठोर पथ्यं पाळावी लागतात. पाच फळं खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. संत्र्यात व्हिटामिन सी असतं. संत्र्यात फायबरदेखील असतं. त्यामुळे चयापचय प्रक्रिया सुरळीत होते. त्यामुळे रक्तदाब आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. पेरमध्ये ग्लायकेमिकचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. पेरूमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त, तर सोडियमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. सफरचंदात अँथोसायनिन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात हे अँटीऑक्सिडंट महत्त्वाची भूमिका बजावतं. रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास द्राक्षदेखील महत्त्वाची भूमिका बजावतं. टॅग्स :मधुमेहdiabetes