Five home made recipes for the rest of the monsoon season
पावसाळ्यात घसा खवखवतोय? या पाच घरगुती उपायांनी मिळवा आराम By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 04:40 PM2018-06-07T16:40:54+5:302018-06-07T16:40:54+5:30Join usJoin usNext काढा : एक कप पाण्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घालावा. पाण्यात तुळस व पुदिन्याची प्रत्येकी ५ ते ६ पाने, गवतीचहाचे १ पान बारीक चिरून घालावे. २ मिरे, दालचिनीचा छोटा तुकडा घालावा व चवीसाठी गुळाचा लहानसा खडा घालावा कढी: पावसाळ्यात थंडगार ताक जरी नको वाटले, तरी ताकाची कढी मात्र प्यावीशी वाटते. कढी करताना फोडणीमध्ये आलं-लसूण ठेचून घालावा व २-३ काळे मिरे, २ लवंगा, दालचिनीचा लहान तुकडा देखील घालावा कुळीथाचे पिठले : २-३ चमचे कुळीथाचे (हुलगा) पीठ २ कप पाण्यात कालवून घ्यावे. कढईत जिर्याची फोडणी घालून त्यात भरपूर कडीपत्ता, व ठेचलेला लसूण घालावा. आवडत असल्यास मिरचीचे १-२ तुकडे घालावे, हिंग घालावे. त्यात कुळीथाचे पाण्यात कालवलेले पीठ घालावे. सुंठ-दूध : १ कप दूध उकळावे. उकळल्यानंतर त्यात पाव चमचा हळद आणि पाव चमचा सुंठ पूड (किंवा किसलेले आले) घालावे. अगदी आवश्यक असल्यास अर्धा चमचा साखर घालावी भाज्यांचे सूप : रेडीमेड नाही! घरी तयार केलेले!! कोणतीही १ भाजी किंवा घरी ज्या असतील त्या भाज्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. वाफवताना चवीसाठी त्यात आले, लसूण, कांदा घालावा. थोडे गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करावे. मिरपूड-मीठ घालावे. पिताना कोमट सूपात लिंबू पिळावेटॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth