florida researchers found ICAM coronavirus cure nearly 100 percent effective
पॉझिटिव्ह बातमी! अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा By manali.bagul | Published: September 27, 2020 01:43 PM2020-09-27T13:43:27+5:302020-09-27T14:11:59+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसचं व्यापक रूप दिवसेंदिवस समोर येत आहे. आतापर्यंत २ कोटींपेक्षा आधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या डॉक्टरांनी कोरोना व्हायरसवर उपचार शोधल्याचा दावा केला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन ही ट्रिटमेंट जवळपास १०० टक्के परिणामकारक ठरणारी आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामधील एडवेंटहेल्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चार वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांना एकत्र करून ही थेरेपी तयार केली आहे. या थेरेपीचं नाव ICAM आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही थेरेपी परिणामकारक ठरते. bgr.com ने याबाबत माहिती दिली आहे. fox35orlando.com मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार ही नवीन थेरेपी तयार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, ही थेरेपी रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्याबरोबरच थेरेपी फुफ्फुसांचा इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरते. सध्या या थेरेपीची वैद्यकिय चाचणी सुरू आहे. डॉक्टरांना या थेरेपीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी आशा आहे. चाचणीदरम्यान ICAM थेरेपी सुरक्षित आणि प्रभावी ठरल्यास रुग्णालयात भरती न होता कोरोना रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरेल असं कोणतंही औषध तयार करण्यात आलेलं नाही. जगभरात कोरोना व्हायरसच्या लसींवर परिक्षण सुरू आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लस आल्याने माहामारीचा नष्ट होईलच असं सांगता येणार नाही. म्हणूनच कोरोनापासून बचाव करण्याासठी लसीला पर्याय शोधले जात आहेत. एडवेंटहेल्थ रुग्णालयाच्या डायरेक्टर ऑफ फार्मेसी कारलेट नोरवूड विलियम्स यांनी फॉक्स ३५ शी बोलताना सांगितले की, या लसीचे चांगले परिणाम दिसून आल्यास पुढच्या टप्प्याबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. ICAM रुग्णांना गंभीर स्थितीत जाण्यापासून वाचवतो. त्यामुळे रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. एप्रिलपासूनच तज्ज्ञांचे या थेरेपीवर काम सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ICAM हे एक औषध नसून चार प्रकारच्या औषधांचा वापर यासाठी करण्यात आलेली थेरेपी आहे. यात इम्यूनोसपोर्ट ड्रग (विटामिन C, जिंक), कोर्टिस्टेरॉईड, अँटीकोएग्युलेंट्स आणि मायक्रोलीड्सचा यात समावेश आहे. टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सअमेरिकाcorona virusHealth TipsAmerica