उन्हाळ्यामध्ये 'ही' फुलझाडं लावा; घर राहिल थंड थंड कूल कूल By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:24 PM 2019-04-12T18:24:30+5:30 2019-04-12T18:34:05+5:30
वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवत असून मार्च महिन्यामध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे. पारा आतापासूनच 32 आणि 40 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. अशातच उन्हाळ्यामध्ये घराचं तापमान सामान्य ठेवण्यासाठी घरामध्ये सीझनल झाडं लावणं उत्तम पर्याय आहे. वैज्ञानिकांच्या मते, या झाडांमुळे घर फक्त थंड राहत नाही तर त्यांचा गंध वातावरण शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
जॅस्मिन ग्रुपमधील फूलं तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला घरामध्ये फुलझाडं लावायची असतील तर सुगंधी आणि पांढऱ्या फुलांची निवड करा. यामध्ये बेल, चमेली, चंपा, मोगरा आणि जुईच्या फुलांचा समावेश करा. ही झाडं सुंगधी असण्यासोबतच यांचे अनेक औषधी गुणधर्मही असतात.
सूर्यफुल सूर्यफुलाचं झाड उन्हाळ्यामध्ये अत्यंत गुणकारी ठरतं. तसेच दररोज याची काळजी घेणंही अत्यंत सोपं आहे. हे वाढविण्यासाठी 7 ते 8 तास उन्हाची गरज असते. हे झाड अस्थमा, कॅन्सर यांसारख्या आजारांवर अत्यंत फायदेशीर ठरतं.
बेल बेलाचा वापर अरोमा थेरपीसाठी करण्यात येतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामोळ्या आणि खाजेवर हे गुणकारी ठरतं.
चमेली आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्यानुसार, चमेलीचं फूल त्वचेसंबंधी आजार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतं. तसेच पोटाच्या समस्याही दूर होतात. फुलांचा रस चेहरा चमकदार करण्यासाठी मदत करतो.
चाफा चाफ्याचं फूल आपल्या सुगंधाने स्ट्रेस लेव्हल मेन्टेन करतो. घरामध्ये हे झाड लावल्याने उन्हाळ्यामध्ये ताजंतवाणं वाटतं.
मोगरा मोगऱ्याचं अत्तर कानामध्ये वेदना झाल्यानंतर त्या दूर करण्यासाठी मदत करतं. तोंड आणि डोळ्यांच्या अनेक समस्यांवरही हे फूल फायदेशीर ठरतं.
जुई जुईचा सुगंध मन शांत करण्यासोबतच थंडावा देण्यासाठीही मदत करतो.
कॉस्मॉस कॉस्मॉस हे सीझनल झाड आहे. जे उन्हाळ्यामध्ये आणखी बहरतं. या झाडाला पांढरी, गुलाबी, नारंगी, मजेंटा आणि पिवळ्या रंगाची असतात. हे झाड 7 ते 10 दिवसांमध्ये उगवतं. यासाठी या झाडाच्या बीया जमीनीवर पसरवून हलकच झाकून टाका.
पोर्टुलाका पोर्टुलाका हे झाड गरम किंवा कोरड्या जमिनीवर येतं. हे रंगीबेरंगी सुंदर फुलांचं झाड आहे. हे झाड कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये लावणं सहज शक्य होतं. जर तुम्ही हे झाड कुंडीमध्ये लावणार असाल तर उन्हामध्ये लावा आणि त्या कुंडीमध्ये पाणी थांबून राहिल याची काळजी घ्या.