foods that we have been washing incorrectly
हे अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीनं धुण्याची सवय बेतू शकते जिवावर By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 01:29 PM2018-11-23T13:29:26+5:302018-11-23T15:30:03+5:30Join usJoin usNext बहुतांश लोक फ्रीजमध्ये ठेवलेली फळे आणि भाज्या धुवून खात नाहीत. या सवयीचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे फ्रीजमधील अन्न खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून नंतरच त्याचे सेवन करा. जेणेकरुन त्यावरील घाण आणि जंतू तुमच्या पोटात जाणार नाही. 2. फ्लावर आणि कोबी : फ्लावर आणि कोबीसारख्या भाज्यांमध्ये हिरव्या रंगाचे किडे असतात. चुकूनमाकून अन्नपदार्थांसहीत शिजल्यानंतरही त्यांचा खात्मा होत नाही. या जंतूंमुळे तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या भाज्या चिरण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये काही वेळासाठी भिजवून ठेवा आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या. 3. सफरचंद : सफरचंद हे आरोग्यवर्धक फळ आहे. मात्र त्याचे सेवन करण्यापूर्वी योग्यप्रकारे स्वच्छ धुणेही तितकेच गरजेचं आहे. सफरचंद खाण्यापूर्वी 12 मिनिटांसाठी बेकिंग सोडा असलेल्या पाण्यात भिजत ठेवा. असे केल्यानं सफरचंदवरील रासायनिक घटक आणि जीवजिवाणू मारले जातात. यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्यानं सफरचंद धुवून खा. 4. भाज्या : भाज्या साध्या पाण्याऐवजी मिठाच्या पाण्यानं स्वच्छ करुन घ्याव्यात. गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाणी उकळून घ्या. या पाण्यात भाज्या स्वच्छ धुवून घ्या. 5. तांदुळ : बऱ्याच जणांना तांदुळ दोन किंवा तीन पाण्यातून स्वच्छ करण्याची सवय असते. पण यामुळे तांदुळमध्ये असलेला स्टार्च सहजासहजी निघून जात नाही. स्टार्चमुळे पचनक्रियेसंबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे तांदुळ किमान 4 ते 5 वेळा तरी पाण्यातून धुवून घ्यावा.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नफिटनेस टिप्सHealthHealth TipsfoodFitness Tips