चिंता वाढली! इम्यूनिटी वाढवणाऱ्या 'या' उपायाने लिव्हर होत आहे डॅमेज, डॉक्टरांनी दिला इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:52 PM 2021-07-05T13:52:15+5:30 2021-07-05T14:11:36+5:30
लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर एएस सोइन ज्यांचा या रिसर्चसोबत काही संबंध नाही. ते म्हणाले की, गुळवेलामुळे लिव्हर डॅमेज झाल्याच्या आतापर्यंत पाच केसेस सापडल्या आहेत. कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या काही आयुर्वेदिक आणि पारंपारिक औषधांमुळे शरीराला गंभीर नुकसान होऊ शकतात. मुंबईतील डॉक्टरांना गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान या उपायांमुळे लिव्हर डॅमेजच्या सहा केसेस आढळल्या आहेत. अशात अनेक रूग्णांना जॉन्डिस आणि लीथर्जी (सुस्ती-थकव्याशी संबंधित आजार)ची समस्या आढळून आली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी जेव्हा या रूग्णांची मेडिकल हिस्ट्री तपासली तेव्हा समोर आलं की, हे सगळे टिनोस्पोरा कार्डोफोलियाचं सेवन करत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर ते गुळवेलाचं सेवन करत होते. भारतात पूर्वीपासून गुळवेलाचा वापर वेगवेगळ्या उपचारांसाठी केला जातो.
'इंडियन नॅशनल असोसिएशन फॉर दी स्टडी ऑफ दी लिव्हर' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टर आभा नागरल यांनी सांगितलं की, एका ६२ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या पोटात दुखत असल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. साधारण चार महिन्यांपर्यंत आजारासोबत लढत असताना महिलेचा मृत्यू झाला.
डॉ. नागरल यांनी सांगितलं की, याचवेळी त्यांना बायोप्सीच्या माध्यमातून लिव्हरमध्ये गुळवेलामुळे होणाऱ्या घातक इंजरीबाबत समजलं होतं. कोरोना काळात अनेकदा हेल्थ एक्सपर्ट्सनी गुळवेलाने इम्यूनिटी वाढते असं सांगितलं होतं.
लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर एएस सोइन ज्यांचा या रिसर्चसोबत काही संबंध नाही. ते म्हणाले की, गुळवेलामुळे लिव्हर डॅमेज झाल्याच्या आतापर्यंत पाच केसेस सापडल्या आहेत. लिव्हर डॅमेजमुळे त्यांच्या एका रूग्णांचा मृत्यूही झाला होता.
डॉक्टर एएस सोइन म्हणाले की, महामारी दरम्यान लोक इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी एका ऑक्सीडेंटच्या रूपात गुळवेलाचा वापर करत होते. ते म्हणाले की, दुर्दैवाने यामुळे बऱ्याच लोकांना लिव्हर टॉक्सिटीचा सामना करावा लागला आहे. गुळवेलाचं सेवन बंद केल्यावर काही महिन्यांनंतर रूग्णांची रिकव्हरी झाली होती.
गुळवेळ त्या अनेक पर्यायी औषधांपैकी एक आहे ज्याची शिफारस स्वत: आयुष मंत्रालयाने केली होती. आयुष मंत्रालयाने दावा केला होता की, गुळवेल SARS-CoV-2 मुळे होणाऱ्या कोविड-१९ या आजारा विरोधात गुळवेल इम्यून बूस्ट करतं.
गुळवेलाची पाने खाण्याच्या पानांसारखी असतात. या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फोरस पुरेशा प्रमाणात असतात. त्यासोबतच यात स्टार्चही भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदानुसार, गुळवेल इम्यून सिस्टीम बूस्ट करण्यासोबतच अनेक घातक आजारांपासूनची सुरक्षा देतो.
विज्ञान विश्वातील अनेक मोठे लोकही गुळवेलाच्या पानांना एक चांगला आयुर्वेदिक उपचार मानतात. मेटाबॉलिज्म सिस्टीम, ताप, खोकला, सर्दी आणि गॅस्ट्रोइंटसटायनल समस्येसोबतच याने अनेक गंभीर आजारांपासून सुरक्षा मिळते. लोक याचं ज्यूसच्या रूपात सेवन करतात.
काविळच्या रूग्णांसाठीही गुळवेलाची पाने फायदेशीर मानली जातात. काही लोक याला चूर्णाच्या रूपातही घेतात. तर काही लोक याची पाने पाण्यात उकडून ते पाणी पितात.