जगात नवा कोरोना व्हायरस कुठे जन्म घेणार आणि काय असेल कारण, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 02:17 PM 2021-06-03T14:17:11+5:30 2021-06-03T14:23:33+5:30
New Coronavirus : हा रिसर्च बर्कले येथील यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, मिलान पॉलिटेक्नीक यूनिव्हर्सिटी आणि न्यूझीलॅंडच्या मॅसी यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केला. वैज्ञानिकांनी सांगितले की, आतापर्यंत SARs-CoV-2 म्हणजेच कोरोना व्हायरस कुठून आला याच्या ठिकाणाची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही जगभरात जमिनीच्या वापराची पद्धत बदलत आहे. जंगल कापले जात आहे. कृषीचा विस्तार होत आहे. या सर्व कामांमुळे वटवाघळं आणि त्यांच्यातील कोरोना व्हायरससाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. याच परिस्थितींचा अभ्यास करून वैज्ञानिकांनी नवा कोरोना व्हायरस निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या हॉयस्पॉटची यादी तयार केली आहे. सोबतच हेही सांगितलं की, या ठिकाणांहूनही कोरोना व्हायरस वटवाघळांमधून मनुष्यांना संक्रमित करू शकतो.
हा रिसर्च बर्कले येथील यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, मिलान पॉलिटेक्नीक यूनिव्हर्सिटी आणि न्यूझीलॅंडच्या मॅसी यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केला. वैज्ञानिकांनी सांगितले की, आतापर्यंत SARs-CoV-2 म्हणजेच कोरोना व्हायरस कुठून आला याच्या ठिकाणाची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. वैज्ञानिकांना हे माहीत आहे की, कोरोना व्हायरसने आधी हॉर्श-शू वटवाघळाला संक्रमित केलं, त्यानंतर तो मनुष्यांमध्ये आला. हे संक्रमण एकतर सरळ झालं किंवा मनुष्य जंगलांच्या किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्याने झालं.
नव्या रिसर्चमध्ये पश्चिम-यूरोपपासून ते दक्षिण-पूर्व आशियापर्यंतच्या देशांचा समावेश करण्यात आला. जिथे जमिनीच्या वापराची पद्धत बदलली आहे. सोबतच इथे हॉर्स-शू वटवाघळांची प्रजाती आहे. जेव्हा वैज्ञानिकांनी जंगलांचे तुकडे, मानवी वस्ती, कृषी विस्तार यांची हॉर्स-शू वटवाघळांच्या निवासाची तुलना केली तर त्यांना आढळून आलं की, नवा कोरोना व्हायरस कुठे जन्माला येऊन लोकांना संक्रमित करू शकतो. कारण आता जो कोरोना व्हायरस तयार होईल, त्याच्या परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असेल.
या रिसर्चमध्ये ज्या ठिकाणांची नावे सांगितली आहेत, जेथून नव्या कोरोना व्हायरसचा जन्म होऊ शकतो. सोबतच मनुष्यांना संक्रमितही करू शकतो. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामद्ये पर्यावरण विज्ञानाचे प्राध्यापक पाओलो डिऑडोरिको यांनी सांगितले की, जमिनीच्या वापराची पद्धत बदलणं मनुष्याच्या आरोग्यावर मोठा प्रभाव टाकते. कारण एकतर आपण पर्यावरण बदलत आहोत. दुसरं मनुष्यांना जूनोटिक डिजीज(प्राण्यांमधून पसरसणारा आजार) चा धोका वाढत आहे. जर सरकारी स्तरावर एखाद्या देशात जमिनीचा वापर बदलत असेल तरी सुद्धा मनुष्याच्या आरोग्यावर होणाऱ्या प्रभावाची टेस्ट केली पाहिजे. कारण यात कार्बन स्टॉक, मायकोक्लायमेट आणि पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल.
सर्वात पहिला देश जिथे नवा कोरोना व्हायरस जन्म घेऊ शकतो त्याचं नाव आहे चीन. चीनमध्ये असे अनेक हॉटस्पॉट आहेत जिथे मांसाच्या उत्पादनांची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळेच प्राण्यांचं मांसाच उत्पादन जास्त होत आहे. चीनसाठी हा चिंतेचा विषय आहे. कारण अशा ठिकाणी असे अनेक जीव असतात जे जेनेटिकली समान असतात. सोबतच त्यांचं इम्यून सिस्टीम कमजोर असतं. हे स्वत: संक्रमित होऊ शकतात आणि महामारी पसरवू शकतात.
चीनसोबतच नव्या कोरोना व्हायरसचा जन्म जपानच्या काही भागात, फिलीपिन्सचा उत्तर भाग, चीनचा दक्षिण भाग आणि शांघाय हे देश नव्या कोरोना व्हायरसचे सर्वात पहिले हॉटस्पॉट ठरू शकतात. इंडो-चायनाचे काही भाग आणि थायलॅंडच्या काही भागातही नवा कोरोना व्हायरस जन्म घेऊ शकतो. कारण या ठिकाणांवर मांस उत्पादने वेगाने वाढत आहेत.
मिलान येथील पॉलिटेक्नीक यूनिव्हर्सिटीमध्ये हायड्रॉल़ॉजी वॉटर अॅन्ड फूड सेफ्टीच्या प्राध्यापिका मारिया रूली यांनी सांगितले की, या रिसर्चमध्ये आम्ही ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्यात शक्यता वर्तवली जात आहे. कारण या भागात जमिनीचा उपयोग बदलत आहे. जंगल कापले जात आहेत. पाण्याच्या उपलब्धतेवर प्रभाव पडत आहे. मांस विक्री, मागणी वाढत आहे. ज्या ठिकाणांवर ही सगळी कामे एकत्र केली जात आहे तिथे नवा कोरोना व्हायरस जन्माला येण्याची शक्यता जास्त आहे.
क्रिस्टीना मारिया रूली म्हणाल्या की, आम्हाला आशा आहे की, आमच्या या रिसर्चमुळे लोकांचं या ठिकाणांवर लक्ष राहील जिथे नवा कोरोना व्हायरस जन्म घेऊ शकतो. सोबतच कोणत्याही प्रकारची महामारी रोखण्यासाठी कठोर नियम बनवले जातील. तसेच त्यांचं सक्तीने पालन केलं जाईल. कारण नैसर्गिक ठिकाणांवर मनुष्यांनी ताबा मिळवल्याने प्राण्यांमधून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.
रूली यांनी सांगितले की, मनुष्य सर्वातआधी जंगल कापतो. तेथील झाडांची कत्तल करतो. या जमिनीवर एकतर ते शेती करतात नाही तर प्राणी पाळतात किंवा उद्योग करतात. म्हणजे अनेक नैसर्गिक जीवांचं घर उद्ध्वस्त होतं. खरंतर या जीवांना जगण्यासाठी एक खासप्रकारचं वातावरण हवं असतं. जे मनुष्यांनी खराब केलं. यांना स्पेशलिस्ट म्हटलं जातं. ते दुसरीकडे जात नाहीत. दुसऱ्या प्रजातींचे जीव ज्यांच्यावर जंगल कापण्याचा प्रभाव पडत नाही त्यांना जनरलिस्ट म्हणतात.
स्पेशलिस्ट प्रजातीचे जीव आपलं घर तुटल्यावर एकतर दुसऱ्या ठिकाणी जातात किंवा त्यांची प्रजाती नष्ट होते. मात्र, जनरलिस्ट प्रजातींचे जीव स्वत:ला वाचवण्यासाठी मनुष्यांच्या वस्तीत जागा शोधतात. त्यांना कोणतंही वेगळं वातावरण नको असतं. त्यामुळे जसे ते मनुष्यांच्या जवळ जातात, त्यांच्यासोबत फिरणारे बॅक्टेरिया-व्हायरस मनुष्यांजवळ येतात. इथूनच मनुष्यात जूनोटिक आजार पसरण्याचा धोका वाढतो.
प्रा. पाओलो डिऑडोरिको म्हणाले की हॉर्स-शू वटवाघळं जनरलिस्ट श्रेणीतील जीव आहेत. ते नेहमीच मनुष्यांच्या हालचालीमुळे विस्थापित होत राहतात. याआधीही पाओलो, क्रिस्टीना आणि डेविड हेमॅन यांनी याचा खुलासा केला होता की, कशाप्रकारे आफ्रिकेतील जंगले कापून जीवांना संपवलं जात आहे. त्यामुळेच लोकांमध्ये इबोला पसरत आहे.