CoronaVirus: तिसऱ्या लाटेआधी लहान मुलांना मोठा दिलासा; सुरक्षित ट्रान्स्परंट मास्कची चाचणी यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 01:01 PM 2021-06-06T13:01:14+5:30 2021-06-06T13:11:14+5:30
Transparent Mask for children's: सीएसआयओच्या संशोधक डॉ. सुनिता मेहता यांनी मार्चमध्ये अशाप्रकारचा मास्क बनविला होता. हा मास्क पॉलिमरचा होता. परंतू त्यात अनेक अडचणी होत्या. त्या दूर करण्यात आल्या आहेत. Corona third wave hit children: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचे सांगितले जात आहे. तर सरकारी संस्था तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका नसल्याचे सांगत आहेत. तरीदेखील पालकांनी सावधगिरी बाळगल्यास तिसरी लाट परतवून लावण्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आली आहे.
केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संघटना (सीएसआयओ) ने पारदर्शक मास्क (transperent mask) बनविले आहे. याद्वारे लहान मुले सुरक्षित राहू शकतील असा दावा करण्यात आला आहे. याची चाचणी एका शाळेमध्ये घेण्यात आली आहे. ही ट्रायल अशा मुलांवर घेतली आहे, जी मुले बोलू शकत नाहीत. इशाऱ्यावर संभाषण करतात.
या मास्कला बाजारात आणण्याची तयारी करण्यात आली आहे. हे ट्रान्स्परंट मास्क जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी सीएसआयओने उत्तर प्रदेशच्या एका मोठ्या कंपनीसोबत करार केला आहे.
सीएसआयओच्या संशोधक डॉ. सुनिता मेहता यांनी मार्चमध्ये अशाप्रकारचा मास्क बनविला होता. हा मास्क पॉलिमरचा होता. महत्वाचे म्हणजे त्यावर बाष्प तयार होत नव्हते. मात्र, त्याचा आकार छोटा असल्याने तो तोंडावर ठीक बसत नव्हता. तसेच श्वास घेताना मास्कचे प्ल्रस्टिक नाका तोंडाला चिकटत होते. सोडताना बाहेर जात होते.
याचवेळी तिसरी लाट आणि लहान मुले यांच्यासाठी धोक्याचा इशारा आला होता. यामुळे पुन्हा यावर काम करण्यास सुरुवात केली. वैज्ञानिकांना या मास्कला अपग्रेड करण्यास प्रयोग सुरु केले.
या पारदर्शी मास्कची दुसरी कॉपी बनविली. हा मास्कदेखील पॉलीमरचा आहे. या मास्कची आउट लाईन ही अल्ट्रासोनिक वेल्टिंग केलेली आहे. यामुळे तो आधीच्या सारखा आत-बाहेर करत नाही. यामध्ये अन्य काही गोष्टीदेखील लावण्यात आल्या आहेत.
मास्क तयार होताच याचा प्रयोग लायन्स क्लब डीफ अँड डंब स्कूलच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आला. मास्क लावल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास काही अडचणी होतात का याची पाहणी करण्यात आली. हा प्रयोग सफल झाला.
कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी हा मास्क देशभरातील मुलांना मिळावा यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. या मास्कची किंमत 200 ते 300 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
मास्कची खासियत... मास्कमुळे चेहरा दिसणार आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशनवर लोकांना सीसीटीव्हीमध्ये पाहता येणार आहे.
धाप लागत नाही आणि फॉगिंगही होत नाही. व्हायरसही आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
हा आहे खरा मास्क... एक मास्क 20 ते 25 वेळा आरामात वापरता येणार आहे. साबनाने धुता येणार आहे. सॅनिटायझरने साफही करता येणार आहे. पाण्याचे थेंब आत प्रवेश करू शकणार नाहीत.