ब्लड प्रेशर ते कॅन्सरवर अत्यंत गुणकारी ठरते 'हिरवी मिरची'; जाणून घ्या, नेमकी किती खायची? By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 08:37 PM 2022-06-25T20:37:44+5:30 2022-06-25T20:46:52+5:30
Green chilli benefits : हिरव्या मिरचीमध्ये देखील काही चांगले गुणधर्म आहेत. रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या अनेक आजारावर हिरवी मिरची गुणकारी ठरते. याबाबत जाणून घेऊया... हिरवी मिरची (Green Chilli) अन्नाची चव वाढवते. अनेकांना तर हिरव्या मिरचीशिवाय जेवण अपूर्णच वाटतं. हिरव्या मिरचीचा वापर हा खूप जण करत असतात. फक्त त्याचं प्रमाण कमी-जास्त असतं.
हिरवी मिरची झणझणीत असल्याने खूप जण ती खात नाहीत. मात्र हिरव्या मिरचीमध्ये देखील काही चांगले गुणधर्म आहेत. रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या अनेक आजारावर हिरवी मिरची गुणकारी ठरते. याबाबत जाणून घेऊया...
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, कॉपर, पोटॅशियम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात. इतकंच नाही तर बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन-झेक्सॅन्थिन इत्यादी आरोग्यदायी घटक आहेत.
वजन कमी करण्यात उपयुक्त लठ्ठपणामुळे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही हिरव्या मिरच्यांचे सेवन केले तर ते वजन वाढण्याच्या समस्येपासून थोडा दिलासा मिळू शकतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर डोळे निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरते. मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्याचा शरीराला देखील मोठा फायदा होतो.
रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की हिरव्या मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या पोषक तत्वांसह अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे हे गुणधर्म आणि पोषक तत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
कॅन्सरविरूद्ध प्रभावी मिरचीमुळे तुम्ही कॅन्सरला बऱ्याच अंशी दूर ठेवू शकता. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या शरीराला फ्री रेडिकल्सपासून संरक्षण देऊन कॅन्सरचा धोका कमी करतात. मात्र, कॅन्सर हा असा आजार आहे की तो दूर ठेवण्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची देखील खाऊ शकतो. त्यात कॅप्साइसिन नावाचे कंपाऊंड असतं, जे मिरचीला मसालेदार आणि आरोग्यदायी बनवते. हृदयविकाराची समस्या दूर करण्यासाठी आणि हृदयाला संरक्षण देण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरू शकते.
त्वचेसाठी फायदेशीर व्हिटॅमिन-ई ने भरपूर हिरवी मिरची तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे तुमचा चेहरा छान राहतो आणि त्वचा नेहमी तरुण आणि सुंदर राहते.
पचनास मदत करते पचनसंस्था सुरळीत चालण्यासाठी हिरवी मिरचीही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. संशोधनानुसार, हिरवी मिरची गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांवर सकारात्मक परिणाम दर्शवू शकते. खरं तर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरमध्ये अपचन, अतिसार आणि बद्धकोष्ठता या लक्षणांचा समावेश होतो.
सर्दी-खोकल्यावर उपयुक्त मिरचीमध्ये असलेले Capsaicin आपल्या नाकातील Mucus Membranes उत्तेजित करते ज्यामुळे आपली बंद असलेली श्वसन प्रणाली उघडते आणि सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.
ब्लड प्रेशर करा कंट्रोल ब्लड प्रेशरमुळे हृदयाच्या समस्यांसोबतच इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे कॅप्साइसिन ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यात हायपरटेन्सिव्ह गुणधर्म आहेत. हा गुणधर्म ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
हिरव्या मिरची जास्त खाल्ल्यास होईल नुकसान हिरव्या मिरचीचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. चीनच्या न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार हिरव्या मिरचीचे अनेक तोटे असू शकतात जे अधिक धोकादायक आहेत.
संशोधनात असे म्हटले आहे की दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने Dementia सारखी स्थिती होऊ शकते. हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिन्स वाढू शकतात.
हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने पोटात ज्या प्रकारची केमिकल रिएक्शन होते. त्यामुळे पोटात जळजळ होणे, फुगणे यासारख्या समस्या होतात. हिरवी मिरची देखील एसिडिटीचे कारण असू शकते, त्यामुळे तिचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.
(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)