Gym mistakes you must avoid at any cost
जिममध्ये चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीत भोगाल गंभीर परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 05:43 PM2019-06-16T17:43:48+5:302019-06-16T17:54:14+5:30Join usJoin usNext जर तुम्ही जिममध्ये एक्सरसाइज करत असाल तर तुम्हाला काही आवश्यक गोष्टीं लक्षात घेणं गरजेचं असतं. नाहीतर तुम्हाला इन्जुरीचा सामना करावा लागू शकतो. वॉर्मअप करा जिममध्ये वॉर्मअप केल्याशिवाय एक्सरसाइज करू नका. जर तुम्ही व्यवस्थित वॉर्मअप केलं तर क्रँप आणि मसल टिअरपासून बचाव करू शकता. (Image Credit : Men's Health)फॉर्मवर फोकस वेट ट्रेनिंग करताना आपल्या फॉर्मवर फोकस करा. योग्य आणि उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी इन्जुरीपासून बचाव करण्यासाठी फॉर्म आवश्यक ठरतं. शो ऑफ करू नका जिममध्ये अजिबात शो-ऑफ करू नका. जर तुम्ही एका लिमिटनंतर वेट उचलू शकत नसाल तर अजिबात जबरदस्ती प्रयत्न करू नका. त्यामुळे इन्ज्युरीचा धोका कमी होतो. ब्रिदिंग आहे गरजेचं एक्सरसाइज करताना ब्रीदिंगवर पूर्ण लक्ष दिलंत तर शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होणार नाही. त्यामुळे अनेकदा लोक बेशुद्ध होतात. त्यामुळे एक्सरसाइज करताना या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. तुमचा श्वास अजिबात मंद होता कामा नये. अशातच तोंड आणि नाक दोघांनीही श्वास घेणं गरजेचं आहे. (Image Credit : dummies.com)स्वतःवर जास्त प्रेशर घेऊ नका अनेकदा आपल्याला हेच समजत नाही की, आपलं शरीर एक लिमिटपेक्षा जास्त प्रेशर घेऊ शकत नाही. अनेकदा ट्रेनर आपल्याला एक्सरसाइज करण्यासाठी जास्त पुश करतात. अशातच आपल्याला आपल्या लिमिटनुसार, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज केल्यानंतर कूल डाउन एक्सरसाइज सुरू करण्याआधी वॉर्मअप करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एक्सरसाइज केल्यानंतर स्ट्रेचिंग आणि कूल डाउन एक्सरसाइज करणंही आवश्यक आहे. यामुळे तुमचं हार्ट रेट आणि टेम्प्रेचर नॉर्मल होतं. योग्य डाएटदेखील आहे आवश्यक... जर तुम्ही जिममध्ये एक्सरसाइज करत असाल तर त्यासोबत योग्य डाएट घेणं आवश्यक आहे. शक्य असेल तर घरीच तयार केलेल्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सFitness TipsHealth Tips