रात्री 9 वाजतानंतर जेवण करता का? होऊ शकता या 6 गंभीर आजारांचे शिकार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 01:28 PM2022-12-05T13:28:31+5:302022-12-05T13:37:17+5:30

Late night dinner side effect : तुम्हीही रात्री उशीरा जेवण करत असाल तर आजच ही सवय बदला नाही तर तुम्हाला खूप महागात पडेल. तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

Late night dinner side effect : रात्रीचं जेवण आपल्या आरोग्यावर फार मोठा प्रभाव टाकतं. बिझी लाइफस्टाईल किंवा लेट नाइट जॉबमुळे अनेक लोक रात्री उशीरा जेवण करतात. तर काही लोकांना रात्री उशीरा जेवण करण्याची सवय असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री फार उशीरा जेवण करणं तुमच्या आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. तुम्हीही रात्री उशीरा जेवण करत असाल तर आजच ही सवय बदला नाही तर तुम्हाला खूप महागात पडेल. तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

NCBI च्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, रात्री 9 वाजतानंतर जेवण करणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. कारण झोपणं आणि जेवणाच्या मधे 2 तासांचा गॅप असणं गरजेचं आहे. जेव्हा लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात, तेव्हा जेवण व्यवस्थित पचन होत नाही. तेव्हा शरीरातील मेटाबॉलिज्म हळूवार काम करू लागतं. यामुळे शरीरात अनेक आजार घर करतात.

रात्री उशीरा जेवण केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, हाय ब्लड शुगर, लठ्ठपणा आणि हृदयरोगसारख्या अनेक आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. जास्तीत जास्त रिसर्चमध्ये सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजतापर्यंत जेवण करणं चांगलं मानलं जातं. चला जाणून घेऊ तुम्हाला कोणत्या समस्या होतात.

पचनाची समस्या - रात्री उशीरा जेवणाची सवय असेल तर सगळ्यात जास्त समस्या पचनशक्तीबाबत होते. रात्री खाल्ल्यानंतर कोणतीही अॅक्टिविटी होत नसते आणि जास्तीत जास्त लोक थेट बेडवर जातात. यामुळे जेवण निटपणे पचन होत नाही. ज्यामुळे अॅसिडिटी, ब्लोटिंग इत्यादींची समस्या होते. त्यासोबतच पोटासंबंधी इतरही काही विकार होतात.

वाढू शकतं वजन - रात्री उशीरा जेवण केल्याने वजन वाढण्याची समस्या कॉमन आहे. वेळेवर जेवण न केल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म स्लो होतं. ज्यामुळे शरीरातील कॅलरी योग्यपणे बर्न नाही आणि त्यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. हेल्‍थ एक्‍सपर्टनुसार, रात्री जेवण केल्याननंतर जर कोणतीही अॅक्टिविटी झाली नाही तरीही जेवण आणि झोपण्यात दोन तासांचा गॅप गरजेचा आहे.

ब्लड प्रेशर - रिसर्च रिपोर्टनुसार, सतत रात्री उशीरा जेवण करण्याच्या सवयीने बीपी, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. उशीरा जेवल्याने वजन वाढतं. ज्यामुळे ब्लड शुगर अनियंत्रित होऊ लागते. पुढे जाऊन यामुळे हार्ट आणि ब्लड प्रेशरसंबंधी समस्या होऊ लागतात.

झोप कमी लागते - रात्री उशीरा जेवण केल्याने झोप न लागण्याची समस्या होऊ शकते. अनेकांना तक्रार असते की, त्यांनी रात्री लवकर झोप येत नाही. याचं मुख्य कारण रात्री उशीरा जेवण करणं हे आहे. उशीरा जेवण झाल्याने आपलं शरीर योग्यपणे अन्न पचवू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येत नाही.

एनर्जी लेव्हल होते कमी - रात्री उशीरा जेवण केल्याने तुम्हाला दिवशी बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि इतर समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. सोबतच योग्यपणे पचन न झाल्याने शरीराल आवश्यक पोषक तत्वही मिळत नाहीत. ज्यामुळे एनर्जी लेव्हल कमी होते. अशात तुमचा पूर्ण दिवस वाया जातो.