The hair become white? Then, would you include 'these' substances in your diet?
केस पांढरे होतात? मग, तुमच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा समावेश असणार? By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:48 PM2019-06-15T17:48:27+5:302019-06-15T18:08:33+5:30Join usJoin usNext कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या आजच्या लाइफस्टाइलमध्ये सामान्य झाली आहे. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी. केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. पण अलिकडे लाइफस्टाइल, धुम्रपान किंवा प्रदूषण यामुळेही केस पांढरे होत आहेत. त्यामुळे केस काळे ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याची गरज पडते. मिठाचं अधिक सेवन : जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांनुसार, एका दिवसात २३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे चांगलं नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी, हाय ब्लड प्रेशर आणि केसगळती व केस पांढरे होणे या समस्या होतात. साखरेचं अधिक सेवन : साखरेचं अधिक सेवन केल्याने आपल्याला आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. याने आपले केसही पांढरे होतात. त्यामुळे मिठाई, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स या गोष्टी टाळाव्या. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन ई चं प्रमाण कमी होतं. हे व्हिटॅमिन केसांच्या विकासासाठी गरजेचं आहे. जास्त गोड पदार्थ आणि कृत्रिम रंगांचा वापर : तुम्ही फार जास्त गोड पदार्थ आणि कृत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. याचे सेवन केल्याने मायग्रेन, अॅलर्जी आणि केस पांढरे होणे या समस्या होतात. सॉफ्ट ड्रिंक : थंड सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कृत्रिम रंग आणि गोडवा असतो. ज्यामुळे शरीरात चरबी वाढतो. याने तुम्ही जाड होऊ शकता. यातील शुगरच्या प्रमाणामुळे तुम्हाला तोंडाच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. सोबतच याने केसही पांढरे होतात. टॅग्स :हेल्थ टिप्सHealth Tips