तुमच्याही चष्म्यावर स्क्रॅच आहेत का?; लगेच चष्मा बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:16 IST2019-04-09T16:12:17+5:302019-04-09T16:16:39+5:30

आपल्यापैकी अनेकजण चष्म्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. अनेकदा हा चश्मा नंबरचा असतो किंवा फॅशन म्हणून वापरतात. साधारणतः चष्मा वापरणारी लोकं लेन्सवर आलेले स्क्रॅच इग्नोर करतात आणि तोच चश्मा वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? असं करून तुम्ही तुमच्या डोळ्यांचं आरोग्य आणखी बिघडवतं आहात. एक छोटासा स्क्रॅचही तुमच्य डोळ्यांचं आरोग्य बिघडवण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.
स्क्रॅच असणारा चष्मा डोळ्यांसाठी नुकसानदायक
स्क्रॅच असणाऱ्या लेन्सचा वापर केल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर थेट परिणाम होत नाही. परंतु अशा प्रकारचे ग्लासेस सतत वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो. ज्यामुळे काही वेळाने आयसाइट्सवर परिणाम होतो.
डोकेदुखीचं कारण
चष्म्याच्या ग्लासवर स्क्रॅचमुळे होणारे आयस्ट्रेन डोकेदुखीचं कारण ठरू शकतात. यामुळे डोकेदुखी वाढूही शकते आणि तुम्हाला औषधांचा आधार घ्यावा लागू शकतो.
एकाग्रतेवर परिणाम
या सर्व समस्यांमुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना त्रास होऊ शकतो. खासकरून जर तुम्हाला कम्प्युटरवर काम करायचं असेल तर या स्क्रॅचेसमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
काय कराल?
चष्म्याची काच नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच काच स्वच्छ करताना काही खास गोष्टी लक्षात घ्या. जसं एखाद्या रफ कपड्याने काच स्वच्छ करू नका. बाजारातून एखादं ग्लास क्लिनर खरेदी करा आणि मुलायम कपड्याने चश्मा स्वच्छ करा.
काच बदली करा
जर काचेवर जास्त स्क्रॅचेस आले असतील तर तुम्ही ग्लास बदली करा. यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही.