Health Benefits of cheese
चीज खाण्याचे आरोग्यदायी फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 12:13 PM2018-04-20T12:13:51+5:302018-04-20T12:13:51+5:30Join usJoin usNext चीजमध्ये मोठ्या प्रमाणावर चरबीयुक्त घटक असतात. म्हणून चीज खाताना आपल्याला दहा वेळा विचार करावा लागतो. पण चीजचे काही आरोग्यासाठी उपयुक्त फायदे देखील आहेत. चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं. १) कॅल्शियम – शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात कॅल्शियम मिळवून देण्याचं काम चीज करतं. जेवल्यानंतर चीज खाल्ल्याने दात निरोगी ठेवण्यास मदत होते. २) कॅन्सरची कमी शक्यता – चीज खाणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर कधीच होत नाही. तसंच चीजमध्ये बी जीवनसत्व असल्याने कोणत्याही रोगाची लागण शरीराला होत नाही. ३) वजन नियंत्रित – चीजच्या काही प्रकारांमध्ये वजन नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चीजचा एक तुकडा दिवसातून एकदा खाल्याने वजन आटोक्यात राहतं. ४) हाडांची मजबूती – चीज खाल्याने हाडे बळकट होतात. तसंच वृद्ध व्यक्तींनी किंवा महिलांनी चीज खाल्ल्यास सांधेदुखी व इतर हाडांच्या दुखण्याचा त्रास होत नाही. ५) बाळंतपण - गरोदर महिलांनी आपल्या आहारात चीजचा समावेश केल्याने जन्माला येणारं बाळ सुदृढ होतं. तसंच बाळ जन्माला येतेवेळी आईला जास्त त्रास होत नाही.टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सfoodHealth Tips