स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:09 PM2023-10-02T14:09:46+5:302023-10-02T14:19:53+5:30

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात, त्याबद्दल जाणून घ्या...

स्ट्रॉबेरीचे नाव ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी आलेच पाहिजे कारण तिची गोड आणि आंबट चव आपल्यापैकी बहुतेकांना आकर्षित करते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगली असते, कारण त्यामध्ये आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात.

यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, फोलेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय, स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडेंट देखील असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. चविष्ट फळ खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात, त्याबद्दल जाणून घ्या...

स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठीही फायदेशीर मानले जातात.

स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत मानली जाते, जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करते. तुमच्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही अनेक प्रकारचे आजार टाळू शकता.

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे इतर पोषक घटक असतात, जे डोळ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्याने वय-संबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा (Age-Related Macular Degeneration) धोका कमी होतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

स्ट्रॉबेरीमध्ये खूप कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही हे एकदा खाल्ले तर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि जास्त खाण्यापासून तुमचा बचाव होईल, अशावेळी तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. हे नियमित खाल्ल्याने तुमचा फिटनेस चांगला राहील.