health benefits of quitting sugar
साखरेचं नाही खाणार, त्याला देव उत्तम आरोग्य देणार! By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:31 PM2019-07-18T17:31:04+5:302019-07-18T17:34:38+5:30Join usJoin usNext समोर गोड पदार्थ आला की अनेकांना नाही म्हणणं जीवावर येतं. गोड पदार्थांवर आडवा हात मारत असताना शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि अनेक त्रास सुरू होतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ टाळल्यास शरीराला अनेक फायदे होतात. साखरेमुळे इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे साखरेचे पदार्श शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा. साखरेचं सेवन कमी केल्यास इन्सुलिनवर नियंत्रण राहतं. त्यामुळे डायबेटिस नियंत्रणात ठेवता येतं. साखरेचं कमी सेवन केल्यानं केवळ डायबेटिस नियंत्रणात राहत नाही, तर त्याचा परिणाम त्वचेवरदेखील होतो. साखर कमी खाल्ल्यास त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. साखरेचं पदार्थ टाळल्यास तुमच्या शरीरातील ग्लुकोज कमी होतं. त्यामुळे शरीर फॅट्सपासून ऊर्जा तयार करतं. त्यामुळे वजन आपोआप कमी होतं. जास्त प्रमाणात साखरेचं सेवन करणाऱ्या महिलांमध्ये मूड स्विंगचं प्रमाण जास्त असल्याचं कोलंबिया विद्यापीठाचं सर्वेक्षण सांगतं. त्या तुलनेत साखरेचं नियंत्रित प्रमाणात सेवन करणाऱ्या महिला जास्त आनंदी असतात. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth