Health: या ५ सप्लिमेंट्सचं एकत्र सेवन करणं धोकादायक, कधीही करू नका ही चूक, बिघडेल तब्येत By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 04:49 PM 2023-03-06T16:49:52+5:30 2023-03-06T16:54:10+5:30
Health: शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्सचं सेवन केलं जातं. मात्र काही जण डॉक्टकांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेतात. ही बाब शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. योग्य कॉम्बिनेशनमध्ये सप्लिमेंट घेतल्याने शरीराला फायदा होतो. मात्र कुठल्या सप्लिमेंट्सचं एकत्रित सेवन करता कामा नये, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्सचं सेवन केलं जातं. मात्र काही जण डॉक्टकांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेतात. ही बाब शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. योग्य कॉम्बिनेशनमध्ये सप्लिमेंट घेतल्याने शरीराला फायदा होतो. मात्र कुठल्या सप्लिमेंट्सचं एकत्रित सेवन करता कामा नये, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हिटॅमिन बी १२ सह व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी१२ सह एकत्रितपणे घेऊ नये. हे दोन्ही सप्लिमेंट एकत्र घेतल्याने व्हिटॅमिन बी-१२चा प्रभाव कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये हे सप्लिमेंट्स किमान दोन तासांच्या अंतराने घेतल्या पाहिजेत.
फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी १२ ही दोन्ही व्हिटॅमिन शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहेत. मात्र फॉलिक अॅसिहसुद्धा व्हिटॅमिनचाच एक प्रकार आहे. मोठ्या प्रमाणावर फॉलिक अॅसिड घेतल्याने व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे लपतात आणि आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे दोन्ही सप्लिमेंट एकत्र न घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
कॉपर आणि झिंक कॉपर आणि झिंक ही दोन्ही महत्त्वपूर्ण मिनरल्स आहेत. बहुतांश लोक आपल्या डाएटच्या माध्यमातून ही पोषक तत्त्वे प्राप्त करतात. मात्र दोन्ही सप्लिमेंट्स एकत्र घेतल्याने डायजेस्टिव्ह सिस्टिममध्ये अडचण येऊ शकतात. अधिक कॉपरचं सेवन केल्याने झिंकची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही सप्लिमेंट्सचं एकत्र सेवन करता कामा नये.
ग्रीन टी आणि आयरन ही दोन्ही सप्लिमेंट्स शरीरासाठी फायदेशीर आहेत. ग्रीन टीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी कंपाऊंड असतात. ते लोकांना इंफ्लेमेशन आणि आतड्याच्या रोगापासून वाचवतात. ग्रीन टी आणि आयरन सप्लिमेंट एकत्र घेतल्याने अँटीऑक्सिडेंट्स आयरनचा प्रभाव संपुष्टात येतो. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आयरनची टंचाई निर्माण होऊ शकते.
इतर मिनरल्ससोबत कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम महत्त्वपूर्ण मिनरल आहे. मात्र जर तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंटसह इतर मिनरल्सचं सप्लिमेंट घेत असाल तर आधी तुम्ही डॉक्टरांशी बोलून घेतलं पाहिजे.