Health: महिलांचे शरीर शुक्राणूंचा कसा स्वीकार करते? संशोधनातून आली धक्कादायक माहिती समोर... By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:20 PM 2021-05-18T16:20:01+5:30 2021-05-18T16:30:07+5:30
Sperm help persuade the female to accept pregnancy: एखादी महिला पुरुषाच्या स्पर्मशिवाय प्रेग्नंट होऊ शकत नाही, हे कडवे सत्य आहे. नवीन अभ्यासामध्ये प्रेग्नन्सीमध्ये थेट भूमिकेच्या व्यतिरिक्त स्पर्म आणखी एक महत्वाचे काम करतो, असे समोर आले आहे. कोणत्याही महिलेसाठी गर्भधारणा काही सोपी प्रक्रिया नसते. यासाठी एकाचवेळी अनेक गोष्टी घडतात. एखादी महिला पुरुषाच्या स्पर्मशिवाय प्रेग्नंट होऊ शकत नाही, हे कडवे सत्य आहे. नवीन अभ्यासामध्ये प्रेग्नन्सीमध्ये थेट भूमिकेच्या व्यतिरिक्त स्पर्म आणखी एक महत्वाचे काम करतो. हा अभ्यास ऑस्ट्रेलियाच्या एडलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. (new research shows that sperm also deliver signals directly to the female reproductive tissues to increase the chances of conception.)
हा रिसर्च नेचर रिसर्च जर्नल कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये छापण्यात आला आहे. यानुसार स्पर्म महिलेला प्रेग्नन्सीसाठी तयार करतो. स्पर्म महिलांच्या प्रजनन उतींना एक असा संकेत देतो, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.
य़ा संशोधनाच्या मुख्य लेखक प्रो. सारा रॉबर्टसन यांनी सांगितले, की हे असा पहिले संशोधन आहे, जे स्पष्ट करते की महिलांची महिलांची इम्यून रिस्पॉन्स स्पर्मकडून मिळणाऱ्या सिग्नलवर काम करते. तसेच एग फर्टिलाईज करण्यास परवानगी देते. यामुळे पुढे जावून गर्भधारणा होते.
आतापर्यंत आम्ही स्पर्मच्या शक्तीचा विचार करत होतो. मात्र, नवीन संशोधनातून त्याच्या उलट माहिती समोर आली आहे. स्पर्ममध्ये फक्त जेनेटिक मटेरिअल असत नाही, तर महिलेच्या शरिराला समजाविण्याचे कामही शुक्राणू करतात. यामुळे तो त्याची प्रजनन क्षमता वाढवितो.
स्पर्ममध्ये असणारे प्रोटीन गर्भधारणेवेळी महिलेची प्रतिकार शक्तीला नियंत्रित करतो. कारण तिचे शरीर बाहेरील शुक्राणूला स्वीकार करू शकेल. शुक्राणू या प्रतिक्रियेला प्रभावित करतो की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे त्या म्हणाल्या.
संशोधकांनी ग्लोबल जीनला समजण्यासाठी उंदराच्या मुत्राशयावर प्रयोग केला. यासाठी पूर्णपणे शक्तीशाली आणि काही नसबंदीवाले स्पर्म मुत्राशयामध्ये सोडले. यामध्ये पूर्णपणे शक्तीशाली असलेल्या शुक्राणुंमुळे मादा उंदराच्या जीनमध्ये जास्त बदल झाले. खासकरून प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेमध्ये.
या अभ्यासानुसार नसबंदी केलेल्या पुरुषांच्या तुलनेत नसबंदी न केलेल्या पुरुषांच्या स्पर्ममुळे महिलांना मजबूत रोगप्रतिकारक सहनशीलता मिळते. महिलांच्या पेशीमध्ये स्पर्मच्या प्रभावाचा थेट परिणाम जाणवतो.
नव्या संशोधनानुसार शुक्राणूंच्या आरोग्याचाही गर्भधारणेवर परिणाम जाणवतो. हे केवळ प्रेन्गंसीसाठी नाही तर बालकाच्या आरोग्यासाठीदेखील महत्वाचे आहे. वय, आहार, वजन, दारू आणि धुम्रपानसारख्या सवयींमुळे शुक्राणूंच्या क्वालिटीवर परिणाम होतो. यामुळे महिलेची प्रेग्नन्सी हेल्थ देखील प्रभावित होऊ शकते.
प्राध्यापक रॉबर्टसन यांनी सांगितले की, असे मानले जाते की स्पर्म केवळ स्त्रीजे बिजांड फर्टिलाईज करतो. मात्र, याशिवाय स्पर्मच्या क्वालिटीचा परिणाम प्रेग्नंन्सीवेळी महिला आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर देखील पडतो.
गर्भपात, गर्भावस्थेच्या शेवटच्या अवस्थेत होणारा रोग किंवा वेळेआधी प्रसुती या परिस्थिती महिलांच्या प्रतिकारक शक्तींमुळे निर्माण होतो. यासाठी पुरुषाचे स्पर्मही तेवढेच जबाबदार असतात, असे ते म्हणाले.