Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 10:49 PM2024-07-05T22:49:14+5:302024-07-05T22:50:15+5:30

जर आपणही वाढलेल्या पोटाच्या समस्येचा सामना करत असाल तर, काही घरगुती उपाय करून चांगला फायदा मिळवू शकता.

खरे तर आपल्याला होणारे बरेच से आजार हे पोटामुळे सुरू होतात. यामुळे आपले पोट व्यवस्थित असणे आणि नियंत्रणात असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपणही वाढलेल्या पोटाच्या समस्येचा सामना करत असाल तर, काही घरगुती उपाय करून चांगला फायदा मिळवू शकता.

आजकाल बरेच लोक वाढलेल्या अथवा बाहेर आलेल्या पोटाचा सामना करताना दिसत आहेत. बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होते. यामुळे वजन वाढते आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. आज जगभरात कोट्यवधी लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.

जर आपले पोटही बाहेर आले असेल आणि आपल्याला ते कमी करायचे असेल, तर घरगुती उपाय करूनही केवळ १५ दिवसांतच आपण त्याचे फायदे मिळवू शकता. तर जाणून घेऊयात काय आहे उपाय...

निसर्गोपचार तज्ज्ञ अथवा नॅच्युरोपॅथी स्पेशलिस्ट डॉ. निताशा गुप्ता यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत 15 दिवसांत बाहेर पडलेले पोट कमी करण्यासंदर्भात घरगुती पद्धत सांगितली आहे. बेली फॅट कमी करण्यासाठी पिवळा मोठा हिरडा अत्यंत गुणकारी आहे. याचा केवळ 15 दिवस वापरून आपण आपली कंबर 2 ते 3 इंच आणि तेवढेच किलो वजन कमी करू शकता, असा दावा त्यांनी केला आहे.

पिवळ्या मोठ्या हिरड्याची पावडर घ्या, पावडर नसेल तर तो किसून त्याचे चूर्णही बनवू शकता. अर्था चमचा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि अनोशेपोटी घ्या. आपले पोट लवकरच कमी होण्यास मद होईल.

हिरडा हे पोटासाठी अत्यंत चांगले फळ आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. नियमितपणे हिरड्याचे सेवन केल्यास, ॲसिडिटीची समस्याही दूर होते.

जर एखाद्याला पोट फुगण्याची समस्या असेल तर त्याच्यासाठीही हिरडा रामबाण ठरू शकतो. तज्ज्ञही हे फळ खाण्याचा सल्ला देतात.