सावधान! शरीरातील एक-एक अवयव निकामी करतात गंभीर आजार; 'या' 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:57 PM2022-07-30T18:57:23+5:302022-07-30T19:06:54+5:30

Health News : शरीर काहीवेळा आजाराबद्दल आधीच इशारा देतं. जर तुम्ही हे संकेत समजून घेतले तर तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. मात्र कामच्या गडबडीत लोक त्यांच्याकडे खूप वेळा दुर्लक्ष करतात.

जगभरात अनेक प्रकारचे आजार आहेत आणि गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरससह नवनवीन गंभीर आजार डोकं वर काढत आहेत. कोणत्याही आजाराची लक्षणे वेळीच दिसली तर योग्य उपचार मिळू शकतात. मात्र, काही आजारांची लक्षणं शेवटच्या क्षणी आढळून येतात.

मानवी शरीर काहीवेळा आजाराबद्दल आधीच इशारा देतं. जर तुम्ही हे संकेत समजून घेतले तर तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. मात्र कामच्या गडबडीत लोक त्यांच्याकडे खूप वेळा दुर्लक्ष करतात.

तुमच्या शरीरामध्ये काही लक्षणं जाणवत असतील तर त्यांना हलक्यात घेऊ नका. अशाच काही समस्यांबद्दल शरीर तुम्हाला आधीच संकेत देतं. त्यांना गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरांचा सल्ल्याने वेळीच उपचार पूर्ण करा. लक्षणांबद्दल जाणून घेऊया...

एका अभ्यासानुसार, कोंडा आणि केस गळणे हे जीवनसत्त्व आणि पौष्टिकतेच्या कमतरतेची लक्षण असू शकते. झिंक, बी2, बी3, बी6 आणि बी7 जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे असे विकार होऊ शकतात.

आजारपण, वृद्धत्व किंवा विशिष्ट औषधांमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो, यामुळे डोळ्यांत आग, जळजळ आणि नुकसान होऊ शकते. मात्र हे Sjogren’s syndrome चे लक्षण देखील असू शकते. या समस्येत अनेकदा तोंड कोरडे पडते.

मायो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, त्वचेवर पुरळ येणे विविध कारणांमुळे होऊ शकते, ज्यात संसर्ग, उष्णता, एलर्जी, रोगप्रतिकारक प्रणालीचे विकार आणि औषधे यांचा समावेश आहे.

सामान्यतः, त्वचा ही लाल होणे आणि खाज सुटणे हे एक्जिमाचे लक्षण आहे, परंतु काहीवेळा ताप तसेच पुरळ येणे, संसर्ग होणे किंवा विशिष्ट वनस्पतींना स्पर्श केल्याने देखील होऊ शकते.

निरोगी जिभेला सहसा गुलाबी रंगाची छटा असते. तुमच्या जिभेवर पांढरे ठिपके दिसले, तर ते ओरल थ्रशचे लक्षण असू शकते, जे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये खूप सामान्य आहे.

घोट्यावर सूज येणे हे गर्भधारणेचे एक सामान्य लक्षण आहे, परंतु जर तुम्ही बाळाची अपेक्षा करत नसाल तर याचा अर्थ खराब रक्ताभिसरण, हृदयाच्या समस्या किंवा थायरॉईड ग्रंथी कमी होऊ शकतात. या लक्षणाचे एक कमी गंभीर कारण म्हणजे जास्त मीठ खाणे.

शरीरावर सुरकुत्या पडणे हे वृद्धत्वाचे सामान्य लक्षण आहे. बराच वेळ पाण्यात राहिल्यानंतरही बोटांचे ठसे सुरकुत्यांसारखे दिसू शकतात. परंतु जेव्हा हात अधिक सुरकुत्या दिसू लागतात, तेव्हा शरीराच्या त्वचेची लवचिकता झपाट्याने नष्ट झाल्यामुळे होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)