तुम्हीही चष्मा लावता? मग तीनपट कमी आहे कोरोनाचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:15 PM 2021-02-24T12:15:05+5:30 2021-02-24T12:53:56+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींच्या यादीत आता चष्माचा देखील समावेश झाला आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक देशांमध्ये व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल दहा कोटींवर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत असून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनाला यश येत आहे.
कोरोनाबाबतच्या संशोधनातून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक अत्यंत महत्त्वाची माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग याची काळजी घेतली जात असतानाच आता आणखी एक पर्याय समोर आला आहे.
कोरोनाचाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींच्या यादीत आता चष्माचा देखील समावेश झाला आहे. कोरोनाच्या संकटात चष्मादेखील व्हायरसविरोधातील लढ्यात मोठी भूमिका बजावत असल्याचं दिसून आलं आहे.
चष्मा घालणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका हा इतरांपेक्षा तीनपट कमी असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून हा खुलासा करण्यात आला आहे. चष्मा आणि कोरोना याबाबत संशोधकांनी अभ्यास केला.
रिसर्चनुसार, कोरोनाची लक्षणं आढळलेल्या 10 ते 80 वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. या संशोधनात 304 रुग्णांवर अभ्यास करण्यात आला असून यामध्ये 223 पुरुष आणि 81 महिलांचा समावेश होता.
यामधील 19 टक्के व्यक्ती सतत चष्मा वापरत होते. जे लोक दिवसातून किमान आठ तास चष्मा लावतात त्यांना कोरोना होण्याचा धोका हा अत्यंत कमी आहे. त्यामुळेच इतरांच्या तुलनेत ते थोडे सुरक्षित आहेत.
रिसर्चमधील व्यक्तींनी एका तासामध्ये सरासरी 23 वेळा तोंडाला हात लावला. त्यापैकी तीन वेळा डोळ्यांना हात लावला. चष्मा लावल्यामुळे जास्तीत जास्त वेळा चेहऱ्याला आणि डोळ्यांना हात लावला जात नाही.
रिपोर्टनुसार, चष्मा न घालणाऱ्यांपेक्षा चष्मा घालणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा धोका दोन ते तीन पटीने कमी होता असं रिसर्चमधून स्पष्ट करण्यात आलं. यापूर्वी डॉक्टरांनी ज्या व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी चष्मा वापरण्याचा सल्ला दिला होता.
चीनमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, गेल्यावर्षी देखील अशीच माहिती ही समोर आली होती. सामान्यांपेक्षा चष्मा असलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका पाच पटींनी कमी होतो.
कोरोना व्हायरस ज्या रिसेप्टरच्या माध्यमातून मानवाच्या शरीरात प्रवेश करतात तो रिसेप्टर ACE-2 हा डोळ्यांत असतो. SARS-CoV-2 हा कोरोनाचा व्हायरस शरीरात डोळ्यांतून प्रवेश करू शकतो आणि चष्मा वापरणाऱ्यांचे डोळे चष्म्यामुळे या व्हायरसपासून सुरक्षित राहतात.
एकंदरीत कोरोनाच्या लढ्यात चष्मा लावणं हे अत्यंत फायद्याचं असून त्यामुळे कोरोनाचा धोका थोडा कमी असल्याचं रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मास्कचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. मास्क दीर्घकाळ लावून राहिल्याने त्याचे काही दुष्परिणाम होत असल्याची माहिती सतत समोर येतं आहे. मास्क लावल्यानंतर कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.
मास्क सतत लावून राहिल्यामुळे अनेकांना त्वचेवर खाज, पुरळ येणं, कान दुखणं अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासोबतच डोळे कोरडे (Dryness in Eyes) पडत असल्याचंही जाणवलं आहे. जर ही समस्या असेल तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
डोळ्यातल्या ओलावा कमी होत असल्यास काही गोष्टी त्यावर उपाय म्हणून करता येतील. आपण मास्क घालतो आणि नाकाने श्वास घेतो. तेव्हा मास्कखालची त्वचा गरम होते. मास्क घातलेल्या असल्याने हवा नीटपणे नाकाच्या आत जाऊ शकत नाही.
तुम्हाला जर दीर्घकाळ मास्क घालून वावरावं लागत असेल तर अशा व्यक्तींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्वचा आणि डोळे नीट व सुरक्षित राहतील याची काळजी घेतली पाहिजे.
मास्क घालणं गरजेचंच आहे पण मास्कचा डोळ्यांवर पडणारा प्रभाव नियंत्रणात ठेवला पाहिजे. तुम्ही तासनतास मास्क घालून राहत असाल तर चांगला फिट बसणारा मास्क घातला पाहिजे. असा मास्क घाला ज्यातून हवा वर डोळ्यांकडे जाणार नाही.