मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
Lip care: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडून ओठ फुटतात हे समजू शकतो, मात्र उन्हाळ्यात ओठ फुटतात तेव्हा प्रश्न पडतो. उन्हाळ्यात वातावरणातील ओलावाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. ओलावा कमी झाल्यामुळे, ओठ कोरडे होण्याची प्रक्रिया सुरू होते. ओठांची त्वचा शरीरातील सर्वात पातळ त्वचा असते. या व्यतिरिक्त, फक्त ओठ हे शरीरातील असे ठिकाण आहे जेथे रोम छिद्रे नसतात आणि घाम बाहेर पडत नाही. म्हणून, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होताच, कोरडा होणारा पहिला भाग म्हणजे ओठ. त्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊ.