Health Tips: मुळ्याच्या चवीने आणि वासाने नाक मुरडू नका; यकृताच्या आरोग्यासाठी फारच गुणकारी! By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:02 PM 2023-12-18T16:02:13+5:30 2023-12-18T16:05:46+5:30
Health Care: पांढरा शुभ्र मुळा ही हिवाळ्याची आपल्याला आरोग्यदायी भेट आहे. तुरट चवीचा मुळा अनेक प्रकारच्या आजारांवर गुणकारी आहे. सॅलडमध्ये गाजर, काकडी, टोमॅटोबरोबर कच्चा मुळ्याचे सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे त्याच्या चवीकडे बघून नाक मुरडू नका तर त्याच्या गुणधर्माचा लाभ करून घ्या. वाचूया मुळा खाण्याचे फायदे आणि त्याची वैशिष्ट्ये! यकृताचे आरोग्य जपायचे असेल किंवा मेदयुक्त यकृताचे आरोग्य सुधारायचे असेल. तसेच कावीळ किंवा टायफॉइडसारख्या यकृताच्या आजारांतुन लवकर बरे व्हायचे असेल तर मुळा हा खात्रीशीर उपाय आहे.
मुळ्यात व्हिटॅमिन सी समाविष्ट आहे. मुळा रस, सूप किंवा भाजी, कोशिंबिरीच्या रूपात सेवन केल्याने त्याचे गुणधर्म तणाव नियंत्रणासाठी हातभार लावतात. यकृत पेशींचे संरक्षण करण्यास आणि यकृत पेशींच्या पुनरुत्पादनास चालना देण्यास मुळा उपयुक्त ठरतो.
मुळ्यात ग्लुकोसिनोलेट्स सारखी संयुगे असतात जी यकृताला त्याच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत मदत करू शकतात. हे संयुगे शरीरातील विषारी द्रव्यांचे विघटन आणि उच्चाटन करण्यास मदत करतात.
मुळा कॅलरी आणि चरबी कमी करण्यास मदत करतो, जे यकृताच्या आरोग्यासाठी महत्वाचे असल्याने वजन नियंत्रित राखण्यास मदत करतो. त्यामुळे जेवणात सॅलडमध्ये कच्चा मुळा, कोशिंबीर, पराठे अशा कोणत्याही स्वरूपात सेवन करा.
मुळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हायड्रेशन होते. रक्तप्रवाहातील विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते आणि ते हायड्रेटेड राहते.
जीवनसत्त्वे, लोह आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक घटक मुळा प्रदान करतो. शिवाय तो स्वस्तही मिळतो. निरोगी आयुष्यासाठी याहून स्वस्त आणि मस्त उपाय दुसरा आहे का सांगा? त्यामुळे नाक मुरडणे थांबवा आणि मुळ्याचे सेवन करा.