Health Tips : बसून की उभे राहून? जाणून घ्या पाणी पिण्याची सर्वांत चांगली पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:00 PM 2022-03-02T15:00:28+5:30 2022-03-02T15:09:17+5:30
Best way to drink water : हेल्थ एक्सपर्टनुसार, एका हेल्दी व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावं. कारण याने शरीर हायड्रेट राहतं. खासकरून उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की पाणी आपल्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. मानवी शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्यापासून तयार झालेला असतो. यावरूनच पाण्याच्या महत्वाचा अंदाज घेतला जाऊ शकतो. आपल्या मेंदूला योग्यप्रकारे काम करण्यासाठी ८० टक्के पाण्याची गरज असते. तर फुप्फुसांना ९० टक्के, रक्ताला ८३ टक्के, हाडांना ३० टक्के आणि त्वचेला ६४ टक्के पाण्याची गरज असते.
पाणी कसं प्यावं? - हेल्थ एक्सपर्टनुसार, एका हेल्दी व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी प्यावं. कारण याने शरीर हायड्रेट राहतं. खासकरून उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं असतं. आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की, पाणी बसून प्यावं की उभं राहून? चला जाणून घेऊ याबाबत काय सांगतात तज्ज्ञ.
पाणी पिण्याची ही पद्धत चुकीची - अनेक लोक अनेकदा घाईघाईने ग्लासने किंवा बॉटलने उभं राहून गटागटा पाणी पितात. या लोकांना वाटत असतं की, उभं राहून पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही. पण वाचून तुम्हाला धक्का बसेल की, ही पाणी पिण्याची योग्य पद्धत नाही. कारण जर तुम्ही उभे राहून पाणी सेवन करत असाल तर शरीराला आवश्यक न्यूट्रिएंट्स पूर्णपणे मिळू शकत नाहीत. असं करून तुम्हालाच धोका निर्माण करत आहात.
खाली बसून पाणी पिण्याचे फायदे - उभं राहून पाणी प्यायल्याने तरल पदार्थ थेट ओटीपोटात जातात. तेच बसून पाणी प्यायल्याने ते पोटात राहतं आणि त्यातील पौष्टिक गोष्टी शरीराला मिळतात. आपलं शरीर अशाप्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे की, ज्यात बसून पाणी प्यायल्याने सर्वात जास्त फायदा मिळतो. पाणी मेंदूपर्यंत पोहोचतं आणि बॉडी अॅक्टिविटिज योग्य राहतात. असं केल्याने पचन तंत्रही चांगलं राहतं. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते.
उभे राहून पाणी पिताना शरीर ‘फाईट अॅण्ड फाईट’ मोडवर असतं. म्हणजेच उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्नायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण तुम्ही बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक (स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणारे काम) प्रक्रिया आराम आणि पचन मोडवर असते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो.
फुफ्फुसे निरोगी राहतात - पळताना किंवा उभे राहून पाणी पिण्याने आपल्या पूर्ण शरीरव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्या फुफ्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. अन्ननलिका आणि श्वासनलिकांना होणारा प्राणवायूचा पुरवठा थांबू शकतो. जेव्हां आपण आरामात बसून पाणी पिता, तेव्हां फुफ्फुसे निरोगी राहतात.
तहान भागते - पाणी शरीरासाठी अत्यावश्यक आहे. माणूस अन्नाशिवाय अनेक दिवस जिवंत राहू शकतो, पण पाण्याविना जगण्याची शक्यता खूपच कमी असते. शरीरात ७०% पाणी असते. जर शरीरात पाण्याचे प्रमाण 1 टक्क्याने कमी झाले तर आपल्याला तहान लागते. जेव्हां आपण पाणी पिण्यासाठी बसतो, तेव्हां आपल्या मेंदूला शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण झाल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. पण जेव्हां आपण उभे राहून पाणी पितो तेव्हां तहान पुरेशी भागत नाही.
त्वचा उजऴते - शरीराला पुरेसे पाणी मिळाले तर कुठलेही त्वचारोग होण्याची शक्यता खूप कमी होते. जेव्हां आपण शांतपणे बसून एक एक घोट पाणी पितो तेव्हां शरीराची पाण्याची गरज व्यवस्थित पूर्ण होते. यामुळे आपली त्वचा उजळते.