फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:25 AM 2024-09-30T11:25:03+5:30 2024-09-30T11:38:35+5:30
बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की, आपण भात खाल्ला पाहिजे का? किती भात खावा?, दिवसातून किती वेळा भात खाऊ शकतो?, दिवसातून दोनदा भात खाणे योग्य की अयोग्य? य़ाविषयी सविस्तर माहिती घेऊ. बऱ्याच लोकांना चपातीपेक्षा भात खायला जास्त आवडतो, कारण तो हलका असतो आणि पटकन तयार होतो, पण तुम्ही दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा भात खाऊ शकता का? याबाबत जाणून घेऊया...
भात खाल्ल्याने वजन, लठ्ठपणा वाढतो असं बहुतेकांना वाटतं, पण भात योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला तर तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो आणि त्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण पूर्ण होते.
बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की, आपण भात खाल्ला पाहिजे का? किती भात खावा?, दिवसातून किती वेळा भात खाऊ शकतो?, दिवसातून दोनदा भात खाणे योग्य की अयोग्य? य़ाविषयी सविस्तर माहिती घेऊ.
वजन कमी करण्यासाठी, भात दिवसातून एकदा किंवा दोनदा खाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो, कारण भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. पण यापेक्षा जास्त वेळा भात खाल्ल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वाढतात.
भातात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जर तुम्ही साध्या भाताऐवजी ब्राऊन राइस किंवा लाल तांदूळ खाल्ला तर त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम देखील असतात.
ग्लूटेन इन्टॉलरेन्स लोकांसाठी ब्राऊन राइस किंवा लाल तांदूळ खाणं फायदेशीर ठरू शकतं. चपातीच्या जागी, तुम्ही दिवसातून एक किंवा दोन वेळा एक वाटी भात खाऊ शकता.
जर दह्यासारख्या प्रोबायोटिकसोबत थोड्या प्रमाणात भात खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांसोबतही भात खाता येतो.
आहारात तांदूळ समाविष्ट करण्यासाठी तुम्ही अधूनमधून इडली, डोसा किंवा बिर्याणी यांसारखे पदार्थही करून पाहू शकता.
आता असा प्रश्न पडतो की रोजच्या आहारात कोणता तांदळाचा भात खावा? तर तुम्ही साध्या पांढऱ्या तांदळाचं सेवन देखील करू शकता, परंतु त्यातील स्टार्च काढून तो कमी प्रमाणात खाऊ शकता.
ब्राऊन राईस किंवा लाल तांदळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक आणि फायबर असतात, जे रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित करू शकतात आणि एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.