Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:08 PM2024-11-28T14:08:21+5:302024-11-28T14:13:39+5:30

Health Tips: भात खाल्ला नाही तर जेवल्यासारखंच वाटत नाही, अशी तक्रार करणारे भातप्रेमी वजनवाढ, मधुमेह, रक्तदाबाच्या भीतीने भात खाणे टाळतात. मात्र भात खाऊन खरंच वजन वाढते का? तसे असते तर दक्षिण भारतातले लोक केवळ भात आणि तांदळाचे पदार्थ खाऊनही एवढे सडसडीत कसे? हा प्रश्न आपल्याला सतावतो, त्यावर हा सविस्तर खुलासा!

भात खाऊन वजन वाढत नाही तर भात शिजवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे वजनवाढ होते आणि अति सेवनामुळे अन्य विकार जडतात. मात्र भात शिजवण्याच्या पद्धतीत छोटासा बदल केला, तरी भात छान शिजेल, रुचेल आणि पचेलसुद्धा!

भात खाल्ल्याने पोटाची चरबी वाढते, रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते का, भात खाल्ल्याने पोट फुगते का, डाएट सुरु केल्यावर भात खाणे सोडावे का?असे अनेक प्रश्न आहार तज्ज्ञांना विचारले जातात. तांदूळ हे जगातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मुख्य अन्न आहे. जरी हे अन्न भरपूर प्रमाणात पौष्टिकतेने असले तरी वजन वाढणे आणि लठ्ठपणा यासंबंधी अनेक प्रश्न भात चुकीच्या पद्धतीने शिजवल्यामुळे निर्माण होउ शकतात.

दक्षिण भारतात पाहिले, तर भात हे त्यांचे मुख्य अन्न आहे. तिथे पोळी वा चपातीचे दर्शनही घडत नाही. रस्सम भात, सांबार भात, नारळ भात, केशर भात, बिसिबेळी भात असे भाताचे नानाविध पदार्थ तिथे केले जातात. भाताचा खास चक्क मुठीत धरून तोंडात नेला जातो. ताटात घेतानाही भाताचा डोंगर सहज रिचवला जातो आणि आपण वाटीभर भात खातानाही नाना शंका घेतो. ती घेण्याची खरंच गरज आहे का?

आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की भात खाल्ल्याने खरंच लठ्ठपणा वाढतो का? हे अनेक घटकांवर अवलंबून असते. मोठ्या प्रमाणात पांढरा भात खाल्ल्याने कॅलरीज वाढू शकतात. जर कॅलरीचा वापर दैनंदिन गरजेपेक्षा जास्त असेल तर वजन वाढू शकते. पांढऱ्या तांदळासारख्या धान्यांमध्ये फायबर असते पोषक तत्वे कमी असतात. ते लवकर पचते आणि रक्तातील साखर वेगाने वाढवू शकते, ज्यामुळे वारंवार भूक लागते. तेल, लोणी किंवा मसाले घालून शिजवलेल्या भातामुळे कॅलरीज वाढतात. फ्राईड राईसमध्ये उकडलेल्या तांदळाच्या तुलनेत जास्त कॅलरीज असतात. ते मसालेदार ग्रेव्ही बरोबर खाल्ले जाते, ज्यामुळे तांदूळ पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. ते लवकर पचत नाहीत आणि रक्तातील साखर वाढवतात.

जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कमी श्रम असलेल्या व्यक्तीने पांढऱ्या तांदळाचे जास्त सेवन केले तर वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमधील संशोधनात असे म्हटले आहे की लाल तांदूळ भातासाठी वापरला असता तो पोटभरीचा ठरतो आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

भरपूर भात खाऊनही दक्षिण भारतीय लोक जाड न होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या तांदळाची गुणवत्ता आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी. दक्षिण भारतातील बहुतेक लोक पॉलिश न केलेला तांदूळ वापरतात. हा तांदूळ नैसर्गिक पोषक आणि फायबरने समृद्ध असतो. ज्यामुळे पचन सुधारते आणि वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. याव्यतिरिक्त, दक्षिण भारतीय आहारामध्ये सांबार, भाज्या आणि नारळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जेवण संतुलित आणि निरोगी बनते.

भात बनवण्याची पद्धत देखील वजन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. दक्षिण भारतात भात शिजवण्याच्या पारंपारिक पद्धतीमुळे तो अधिक आरोग्यदायी बनतो. तिथे लोक प्रेशर कुकरऐवजी भांड्यात भात तयार करतात. भांड्यात भात शिजवताना फेस तयार होतो. तो काढला जातो. या फोममुळे लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हा फोम मुख्यत्वे अतिरिक्त स्टार्चचा बनलेला असतो, ज्यामुळे तांदूळ अधिक कॅलरी बनवतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कुकरऐवजी पातेल्यात भात शिजवा आणि भातावरील पाणी उकळून आलेला फेस काढून टाका. या पारंपारिक पद्धतीमुळे तांदूळ अधिक पौष्टिक आणि हलका होतो.

आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट प्लॅन्सचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आहारात काही बदल करून तुम्हीही वजन कमी करू शकता. ब्राऊन राइसमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यातील फायबर सामग्री भूक नियंत्रित करण्यास आणि कॅलरीज कमी करण्यास मदत करते. कमी प्रमाणात सेवन करूनही पोट भरण्यास मदत होते.