चिंताजनक! मेंदू, हृदयावरच नाही तर किडनीवरही होतोय उष्णतेचा वाईट परिणाम; 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:37 AM2024-05-30T09:37:30+5:302024-05-30T09:50:37+5:30

अतिउष्णतेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर खूप वाईट परिणाम होत असल्याचं आता समोर आलं आहे. उष्णतेमुळे हीट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

भारतात खूप उष्णता वाढत आहे. या अतिउष्णतेमुळे हृदय, मेंदू आणि किडनीवर खूप वाईट परिणाम होत असल्याचं आता समोर आलं आहे. उष्णतेमुळे हीट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

अति उष्णतेमुळे लोक अनेकदा डिहायड्रेशनला बळी पडतात. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाही. या स्थितीत किडनीला योग्य प्रकारे आपलं काम करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

उष्णतेमुळे पचनाच्या समस्या देखील असू शकतात. यामुळे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन देखील होतं. अति उष्णतेमुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

उष्णतेमुळे अनेकदा छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येण्याची समस्या उद्भवते. अन्नही नीट पचत नाही.

उष्णतेपासून वाचण्यासाठी दररोज नारळ पाणी प्या. कारण नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही.

उन्हाळ्यात काकडी जरूर खा. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. शरीरातील पाण्याची पातळी राखते. तसेच शरीराचे तापमान राखते. काकडी खाल्ल्याने वजन वाढत नाही.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे चांगल्या बॅक्टेरियासाठी ओळखले जातात. त्यामुळे पोटही थंड राहते. याशिवाय दह्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.