high cholesterol diet food that filter out ldl low density lipoprotein cholesterol
High Cholesterol: शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल रक्तातून वेगळं करतात 'या' गोष्टी, वेगानं वाढतं गुड कोलेस्ट्रॉल; जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 09:19 AM2023-02-20T09:19:47+5:302023-02-20T09:30:20+5:30Join usJoin usNext शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुयोग्य राहिली तर तुमचं आरोग्य देखील निरोगी राहतं. रक्तात दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल आढळून येतं. ते म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. यातील बॅड कोलेस्ट्रॉल खूप धोकादायक मानलं जातं. नसांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हृदयापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत सुरू राहत नाही. यामुळेच हृदयरोगाचे विकार संभवतात आणि स्ट्रॉकचाही धोका संभवतो. कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल खूप महत्वाचं असतं. जर तुम्हालाही हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर अतिशय विचारपूर्वक डाएट फॉलो करणं महत्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतात हे पदार्थ- बीन्स- बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असं. पचण्यासाठी थोडा वेळ लागत असला तरी यामुळे पोट अधिक काळ भरलेलं राहतं. वजन कमी करण्यासाठी देखील बीन्स फायदेशीर ठरतात. प्लांट बेस्ड फूड्स हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी प्लांट बेस्ड फूड्सचं अधिक सेवन केलं पाहिजे. प्लांट बेस्ड फूड्समध्ये पालक, मटार, टोफू इत्यादींचा समावेश होतो. यासर्वांमध्ये पर्याप्त प्रमाणात पोषक तत्व असतात आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मासे मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिड युक्त असतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूप मदत करतात. तुम्ही जर मासे खात नसाल तर फिश ऑइल कॅप्सूल खाऊ शकता. याशिवाय सूर्यफूलाच्या बिया, चिया सीड्स, भांगाच्या बिया, तीळ आणि भोपळ्याच्या बियांचं सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, शेंगदाण्यांमध्ये अतिरिक्त पोषक तत्व असतात जे आपल्या हृदयाचं संरक्षण करण्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. एवोकाडो ब्लड प्रेशनच्या रुग्णांना एवोकाडोचं सेवन नक्कीच करायला हवं. एवोकाडोमध्ये विटामीन K, C, B5, B6, E आणि मोनोअनसैच्युरेटेड फॅड असतं. जे आपल्या हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतं. तसंच यामुळे स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. एवोकाडो शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात राखतं. पपई पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. जे ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यात मदत करतं. सोबत बॅड कोलेस्ट्रॉल देखील कमी करतं. एका मोठ्या पपईमध्ये १३ ते १४ ग्राम फायबर असतं. दररोज पपई खाल्ल्यानं पचनक्रिया देखील सुरळीत होते. टोमॅटो टोमॅटोमध्ये विविध प्रकारची पोषक तत्व असतात. यात विटामीन A,B,K आणि C असतं जे स्कीन, डोळे आणि हृदयासाठी खूप उपयोगी असतं. याशिवाय टोमॅटोमध्ये पोटॅशियम देखील मोठ्या प्रमाणात असतं जे कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशन आणि स्ट्रोकचा धोका कमी करतं. सफरचंद डॉक्टर दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात कारण यात अनेक प्रकारच्या आजारांना दूर करण्याची क्षमता असते. सफरचंदात पेक्टिन नावाचं फायबर असते जे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात खूप मदत करतं. टॅग्स :आरोग्यहृदयरोगहेल्थ टिप्सHealthHeart DiseaseHealth Tips