CoronaVirus : कोरोना विषाणूंवर उपचारांसाठी HIV च्या औषधापेक्षा प्रभावी ठरेल चहा; तज्ज्ञांचा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 02:58 PM2020-05-24T14:58:17+5:302020-05-24T15:18:18+5:30Join usJoin usNext कोरोनाच्या महामारीचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध आलेलं नाही. असं असलं तरी भारतात कोरोना विषाणूंच्या संक्रमणातून बरे होत असलेल्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. अलिकडे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एचआयव्हीची औषधं कोरोनावर उपचारासाठी प्रभावी ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. पण या औषधांपेक्षाही कांगडा चहा कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असा दावा हिमाचल प्रदेशातील तज्ज्ञांनी केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशच्या पालमपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हिमालया बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीचे डॉ. संजय कुमार यांनी आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त आयोजित वेबिनारदरम्यान कांगडा चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असा दावा केला आहे. पुढे ते म्हणाले की, "चहामध्ये असे रसायन असतात जे कोरोना विषाणूंना नियंत्रणासाठी एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत जास्त परिणामकारक ठरू शकतात. आमच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर आधारित मॉडेलचा वापर करून जैविक रूपानं सक्रिय 65 रसायन किंवा पॉलिफेनॉल्सचं परीक्षण केलं आहे. . जे विशिष्ट प्रोटिनला एचआयव्हीविरोधी औषधांच्या तुलनेत जास्त चांगल्या प्रकारे जखडून ठेवू शकतात तसंच मानवी पेशींत विषाणूंना प्रवेश करण्यात मदत करणाऱ्या व्हायरस प्रोटिनला हे रसायन निष्क्रिय करू शकतात". IHBT कडून चहावर आधारित नैसर्गिक सुगंधित तेलयुक्त अल्कोहोल सॅनिटायझरचं उत्पादनही केलं जात आहे. . तसंच चहाच्या अर्काचा वापर करून हर्बल साबणही तयार केले जात आहे. या साबणात एंटिबॅक्टेरिअल, एंटिव्हायरल गुण आहेत. हिमाचलातील दोन कंपन्यांमार्फत या साबणाचं उत्पादन आणि मार्केटिंग केलं जातं आहे. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे चहाच्या बीयांमध्ये लठ्ठपणा रोखणारे गुण असतात. याशिवाय आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदिक वनस्पतींच उत्पादन वाढवण्यात आलं आहे. कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी फायदेशीर या वनस्पतींचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusCoronaVirus Positive News