Home ACs dont pose coronavirus threat know who to take care of it kkg
CoronaVirus: एसीमुळे वाढतो कोरोनाचा धोका?; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:30 PM2020-04-09T17:30:30+5:302020-04-09T17:51:05+5:30Join usJoin usNext कोरोनाचा विषाणू थंड वातावरणात बराच काळ टिकतो. त्या तुलनेत उष्ण वातावरणात तो टिकत नाही. त्यामुळे एसीचा वापर टाळावा, असे मेसेज सध्या व्हॉट्स ऍपवर फिरताहेत. एप्रिल महिना सुरू झाल्यानं उकाडा वाढला आहे. मात्र कोरोनामुळे अनेकांना एसी सुरू करण्याची भीती वाटते. एका रूममध्ये एसी असेल तर त्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो याविषयी कुठलाही पुरावा नाही व याची शक्यताही नाही. पण सेंट्रल एसी ज्यातून सगळीकडे फिरून हवा जाते, याविषयी अजून निश्चित माहिती नाही. सेंट्रल एसीपेक्षा वैयक्तिक रूमसाठीचा एसी चांगला. मात्र वापरण्याअगोदर हा एसीही स्वच्छ करून घ्यावा. अस्वच्छ एसीमुळे दमा, ऍलर्जिक खोकला, सर्दी वाढते व ताप-सर्दी-खोकला व त्यातच लिजोनेल्ला, असीनॅटोबॅक्ट हे निमोनिया करणारे बॅक्टेरिया एसीमधून पसरतात. उन्हाळा नुकताच सुरू झाल्यानं या दिवसात अचानक अनेक महिने बंद असलेले एसी सुरू होतात. बरेचदा हे एसी स्वच्छ न करता चालू केले जातात. बऱ्याच दिवसांनी एसी सुरू केल्यानं अनेक दिवस अडकलेले ऍलर्जीस बाहेर पडतात आणि दमा, ऍलर्जी बळावते. अस्वच्छ एसीमध्ये लिजोनेल्ला, असीनॅटोबॅक्ट हे निमोनियाची लागण करणारे जंतू असतात हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालंय. एसीची स्वच्छता करताना योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम एसीचे स्वीच बंद असल्याची खात्री करून घ्या. एसी उघडण्याआधी चेहरा, डोके झाकून घ्या. मास्क व गॉगलचा वापर करा. एसीतील जाळी काढून पाण्यामध्ये दोन तास भिजवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशनं ती स्वच्छ घासून घ्या. त्यानंतर एक दिवस ती उन्हात वाळू द्या. एसीचा आतील भाग हेअर ड्रायरनं गरम हवा मारून ५ ते १० मिनिटं स्वच्छ करून घ्या. यावेळी चेहरा शक्यतो दुसऱ्या बाजूला घ्या आणि हेअर ड्रायर फिरवताना उडणारी धूळ डोळे, नाका-तोंडात जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठीच मास्क व गॉगलचा वापर करा. यानंतर एसीची जाळी व्यवस्थित बसवा आणि मग एसी सुरू करा. यानंतर दर महिन्यातून एकदा जाळी झटकून स्वच्छ करायला विसरू नका.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus