home remedies of egg shells
अंड्याच्या कवचाचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:37 PM2018-07-11T15:37:17+5:302018-07-11T15:45:35+5:30Join usJoin usNext अंड्याचा वापर केल्यानंतर अंड्याचे कवच आपण कचऱ्यात टाकून देतो. काही लोकं घरातील पालींना पळवून लावण्यासाठी अंड्याच्या कवचाचा वापर करतात. पण त्याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी अंड्याच्या कवचांचा वापर तुम्ही करू शकता. अंड्याच्या कवचाचा वापर कॅल्शिअमचा स्त्रोत म्हणूनही करण्यात येतो. कवचांना गरम पाण्याने धुवून उन्हामध्ये सुकवावे. त्यानंतर त्यांची बारिक पावडर करावी आणि एका एअर टाईट डब्यामध्ये ठेवावी. त्यानंतर तुम्ही कॅल्शिअम पावडर म्हणून वापर करू शकता. अंड्यांच्या कवचाचा वापर घरातील किटकांना पळवून लावण्यासाठीही उपयोग होतो. कपड्यांची चमक राखण्यासाठीही अंड्यांच्या कवचाचा उपयोग होतो. एका बादलीमध्ये दोन चमचे अंड्यांच्या कवचांची पावडर टाकून त्यामध्ये रात्रभर कपडे भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी कपडे धुतल्यानंतर कपड्यांवर एक वेगळी चमक जाणवेल. भाज्या आणि फळांजवळ नेहमी किडे येतात. त्यासाठी तुम्ही अंड्याची कवचे तोडून भाज्या आणि फळांच्या आसपास ठेवू शकता. त्यामुळे किडे दूर राहण्यास मदत होईल. मेणबत्ती म्हणून तुम्ही अंड्याच्या कवचाचा वापर करू शकता. त्यासाठी अंडे वरच्या बाजूला व्यवस्थित तोडून ते धुवून त्यामध्ये नंतर मेण भरून त्यामध्ये एक वात लावू शकता. बाहेरून मांजर येवून तुमच्या घरामध्ये धुमाकूळ घालत असेल तर तिला घरापासून लांब ठेवण्यासाठी अंड्याच्या कवचाचा वापर करू शकता. ज्या ठिकाणी मांजर येत असेल त्याठिकाणी काही अंड्यांची कवचे तोडून टाकावीत. मांजर पळून जाईल. अंड्याच्या कवचाची पावडर अंड्यामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या त्वचेवर तजेला येईल. जर तुमच्या त्वचेला जळजळ किंवा खाज येत असेल. तर त्यासाठीही अंड्याची कवचं फायदेशीर ठरतात. घरातील खरकटी भांडी साफ करण्यासाठी अंड्याची कवचे मदत करतात. साबणाच्या पाण्यामध्ये अंड्याच्या कवचांची पावडर मिक्स करावी त्यानंतर या मिश्रणाने भांडी स्वच्छ करावीत.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth