How to control a diabetes sugar lavel myb
घरी बसून तुम्ही जास्त गोड खाताय का? साखरेचं प्रमाण नियंत्रणात आहे की नाही 'असं' ओळखा By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:15 AM2020-05-22T11:15:43+5:302020-05-22T11:35:55+5:30Join usJoin usNext गोड खावसं वाटणं: जेव्हा तुम्ही काही गोड खात असाल तर तेव्हा शरीराला अजून जास्त गोड खाण्याची इच्छा होते. तेव्हा तुम्ही आपली सतत गोड खाण्याची सवय नियंत्रणात ठेवायला हवी. अन्यथा रक्तातील साखरेती पातळी वाढू शकते. त्यामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आपल्या गोड खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. जास्त साखर खाल्यामुळे सुरकुत्या येतात: जास्त साखर खाल्यामुळे शरीरातील कोलोजन आणि इलास्टीनचं प्रमाण वाढतं. ही दोन्ही तत्व त्वचेला घट्ट आणि मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कमी वयात त्वचेवर सुरुकुत्या येणं हे जास्त साखर खाण्याचे लक्षणं आहे. त्यामुळे वयाआधीच तुम्हाला त्वचेवर सुरकुत्या दिसत असतील तर साखरेचं सेवन बंद करा. शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढतं: सााखरेचं जास्त प्रमाणात सेवन करणं शरीरातील अतिरिक्त चरबी वाढण्याासाठी कारणीभूत ठरतं. जर तुमच्या शरीरातील चरबी वाढत असेल म्हणजेच पोट, मांड्या हातांची चरबी लटकत असेल तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असू शकता. आपण जाड होत आहोत. असं वाटत असेल तर साखरेचं सेवन कमी करा. दात किडणे : तुम्हालाही माहिती असेल तर जास्त गोड खाल्ल्यामुळे दातांना किड लागते. म्हणून दातांचे सतत निरिक्षण करायला हवं. जर तुमचे दात सडत असतील किंवा किड लागत असेल तर साखरेचं सेवन बंद करा. नाहितर समस्या वाढण्याची शक्यता असते. शरीराला सूज येणं : साखरेचं अतिसेवन शरीरातील सूज वाढवून आजारांचा धोका जास्त वाढवतं. त्यामुळे पायांना सूज येते. शरीरातील इतर भाग सुद्धा सुजतात. तुम्हाला अशी लक्षणं जाणवत असतील तर साखरेचं सेवन करू नका. गॅस होणं : जास्त साखर खाल्यामुळे पोटात गॅस होणं हे स्वाभाविक आहे. कारण साखरेमुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे गॅस, पोट साफ न होणं अशा समस्या निर्माण होतात. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर साखरेचं सेवन कमी प्रमाणात करा. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth