Corona virus च्या नव्या व्हेरिअंटचा भारताला किती धोका? ही 3 लक्षणं दिसताच सावध व्हा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:21 PM 2022-12-21T12:21:26+5:30 2022-12-21T12:31:42+5:30
How dangerous Omicrone BF.7: BF.7 ची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब कोरोना टेस्ट करायला हवी. याशिवाय, जे लोक आधीपासूनच कोणत्याना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत त्यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. चीन, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेते आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरस व्हेरिअंटने भारताची चिंता वाढली आहे. यासंदर्भात सरकार अलर्ट मोडवर आले आहे. भारतात कोविड-19 च्या नवीन प्रकारांचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तयारीही सुरू केली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच बरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज (21 डिसेंबर) कोरोना संसर्गासंदर्भात आढावा बैठकही घेणार आहेत.
चीनमध्ये कोविड-19 च्या बीएफ.7 व्हेरिअंटचा कहर - चीनमध्ये ओमायक्रॉनचा सबव्हेरिअंट बीएफ.7 (Omicron Sub-variant BF.7)ने कहर सुरू केला आहे. हा व्हेरिअंट लोकांना अतिशय वेगाने आपल्या विळख्यात घेत आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनची राजधानी बीजिंगमध्ये जवळपास 70 टक्के लोक या व्हिरिअंटच्या पाशात आले आहेत.
हळूहळू येथील मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. येथील परिस्थिती एवढी बिकट झाली आहे, की लोकांना आपल्या नातलगांचे अंत्यसंस्कार करण्यासाठीही वेटिंगमध्ये थांबवावे लागत आहे. यामुळे भारतासह अनेक देश अलर्टमोडवर आहेल आहेत. कोरोना व्हायरस चीननंतर पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात पसरतो की काय अशी भीती वाटू लागली आहे.
भारतासाठी किती घातक आहे बीएफ.7 व्हेरिअंट? - कोरोनाचा BF.7 हा नवा (Covid-19 New variant BF.7) व्हेरिअंट भारतासाठी किती धोकादायक? यासंदर्भात बोलताना तज्ज्ञांनी म्हटले आहे, की यापासून फारसा धोका नाही. मात्र, असे असले तरी, सतर्क राहणे आवश्यक आहे. अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा म्हणाले, चीनमधील स्थितीबाबत भारताने काळजी करायची गरज नाही, कारण अशी परिस्थिती येथे निर्माण होणार नाही. पण, याबरोबरच सतर्कही रहावे लागेल. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. यामुळे बहुतेक लोकांमध्ये संसर्गाशी लढण्याची प्रतिकारशक्तीही आहे.
हे 3 लक्षण दिसताच व्हा अलर्ट - ओमायक्रॉनचा sub-variant BF.7 (Omicron Sub-variant BF.7) हा भलेही लोकांना झपाट्याने आपल्या विळख्यात घेत असेल, पण तो फारसा धोकादायक नाही. याची लक्षणे ओमायक्रॉनच्या जुन्या व्हेरिअंट प्रमाणेच आहेत. याचे संक्रमण झाल्यानंतर, रुग्णांच्या घशात गंभीर संक्रमण होते, अंगदुखी, हलका अथवा तीव्र ताप यांसारखी लक्षणे दिसत आहेत.
बचावासाठी तत्काळ करा हे काम - बदलत्या हवामानामुळे बहुतांश लोकांना सर्दी, ताप जाणवत आहे. मात्र, आपल्याला तीन दिवसांपेक्षा अधिक ताप असेल आणि BF.7 ची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब कोरोना टेस्ट करायला हवी. याशिवाय, जे लोक आधीपासूनच कोणत्याना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत त्यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. याशिवाय लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनीही स्वतःची काळजी घ्यायला हवी.