तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:50 PM2024-09-30T16:50:45+5:302024-09-30T17:02:24+5:30

How much water should a person drink a day: एका व्यक्तीने एका दिवसात किती ग्लास पाणी प्यायला हवे, याबद्दल संशोधन काय सांगते?

आपल्या शरीराचे वजनात जवळपास ६० पाण्याचा समावेश आहे. शरीरातील बहुतांश क्रियांसाठी पाण्याची गरज असते.

पेशींपर्यंत पोषक घटक पोहोचवणे, अनावश्य पदार्थ बाहेर टाकणे, जेवण पचवणे अशा क्रियांसाठी पाणी लागते.

शरीरात पाणी कमी झाले, तर डिहायड्रेशन, गोंधळ आणि चक्कर येण्यासारख्या समस्या येऊ शकतात.

त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलाच हवे. शरीराला किती पाणी हवे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात वजन, शरीराचा आकार, तापमान, शारीरिक हालचाली आदी.

संशोधनानुसार, एका व्यक्तीने दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यायला हवे. पुरुषांनी तीन लिटर पाणी प्यायला हवे. महिलांनी दिवसभरात २ लिटर पाणी प्यायला हवे आणि मुलांनी दिवसभरात ६ ते ८ कप पाणी प्यायला हवे.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.

तुम्ही जर शारीरिक हालचाली जास्त करत असाल आणि उष्ण वातावरणात राहत असाल, तर तुम्ही जास्त पाणी प्यायला हवे. किडनी किंवा ह्रदयांचा आजार असेल, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यायला हवे.

तुमच्या तोंड आणि घसा लवकर कोरडा पडत असेल किंवा लघवीचा रंग पिवळा दिसत असेल, तर तुमचे शरीर डिहायड्रेड झाले आहे.

शरीराच्या सर्व भागांना कार्यरत ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर लगेच २ ग्लास पाणी प्यायला हवे. पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणाआधी अर्धा तास आधी १ ग्लास पाणी प्या.