How to control diabetes in winter Eating these 5 things will definitely benefit you Healthcare tips
हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवाल? 'या' ५ गोष्टी खाल्ल्याने होईल हमखास फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 04:10 PM2023-12-07T16:10:20+5:302023-12-07T16:26:56+5:30Join usJoin usNext डायबेटिस असलेल्यांनी हिवाळ्यात काय खावं ते जाणून घ्याHow to control Diabetes in Winter Season: हिवाळा हा ऋतु आल्हाददायक असला तरी मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात पुढील ५ गोष्टींचा समावेश करा. पालक आणि मुळा यांसारख्या पालेभाज्या फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी युक्त असतात. या भाज्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरी आणि इतर बेरीच्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. ते शरीराची साखरेची गरज नियंत्रिक करून रक्तातील साखरेची पातळी समतोल राखण्यास मदत करतात. कोबी, ब्रोकोली किंवा तत्सम भाज्यांमध्ये कार्ब्सचे प्रमाण कमी असते तर फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. गाजर, मुळा, बीट किंवा रताळे यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्याने हिवाळ्यात रक्तातील साखर वाढण्यापासून रोखता येते. बदाम, अक्रोड आणि चिया सीड्स, काजूबिया यासारख्या सुक्यामेव्याने मधुमेह नियंत्रित होतो. हेल्दी फॅट आणि प्रोटीनने युक्त असलेल्या या गोष्टी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.टॅग्स :मधुमेहहेल्थ टिप्सआहार योजनाआरोग्यdiabetesHealth TipsHealthy Diet PlanHealth