वाहणाऱ्या नाकामुळे हैराण झालायत? 4 सोपे घरगुती उपाय करा अन् ठणठणीत व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:48 IST2023-09-30T15:22:29+5:302023-09-30T15:48:26+5:30
वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि नाक गळणं ही अनेकांची समस्या असते

Runny Nose Home Remedies: आता पावसाळा संपत आला आहे. लवकरच 'ऑक्टोबर हिट'ची झळ साऱ्यांनाच बसणार आहे. बदलत्या हवामानात सर्दी, खोकला आणि नाक वाहणं ही अनेकांचीच समस्या असते. तापमानातील बदल हे अनेक रोगांचे कारण ठरते.
जेव्हा नाक वाहू लागते, तेव्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे कठीण होते आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणीही खूप त्रास सहन करावा लागतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता ते जाणून घेऊया.
तुळशीचा वापर-
तुळशीचे रोप भारतातील बहुतेक घरांमध्ये आढळते. या वनस्पतीची पाने पावसाच्या पाण्यात धुवून रात्रभर ठेवा आणि सकाळी त्याचा रस प्यायल्याने नाक वाहणे थांबण्यास मदत होते.
स्टीम आणि व्हेपोरायझर-
स्टीमर आणि व्हेपोरायझर वापरल्याने नाक वाहणे कमी होऊ शकते. गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही नाक वाहणे कमी होते आणि व्हेपोरायझरमुळे श्वसनमार्गाचा अडथळा कमी होते.
अंडी आणि मध-
अंडी आणि मध यांचे मिश्रण प्यायलाने नाक वाहणे थांबवण्यास मदत करू शकते. एक लहान अंडे फेटून त्यात थोडे मध घालून प्या. यामुळे नाक वाहणे कमी होईल.
गरम पाणी आणि बाम-
वाहणारे नाक थांबवण्यासाठी गरम पाणी वापरणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. मोठा कप भरून गरम पाणी घ्या आणि त्यात थोडा बाम घाला. मग डोक्यावर टॉवेल ठेवून त्याची वाफ घ्या.