How to recognize a breast cancer tumor?
स्तनाच्या कर्करोगाची गाठ कशी ओळखणार? By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:00 PM2023-03-20T12:00:46+5:302023-03-20T12:15:00+5:30Join usJoin usNext लवकर निदान झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असते. मुंबई : स्तनाचा महिलांमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. काही वर्षांपूर्वी ४० वर्षे पार केलेल्या महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसते; परंतु आता ३० वर्षानंतरच याचा धोका वाढत चालला आहे. या आजाराच्या संकेताविषयी जाणून घेणे खूप आवश्यक आहे. लवकर निदान झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असते.सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार कर्करोगामुळे दर सहा मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होत असून ही आकडेवारी चिंताजनक आहे. स्तनाच्या कर्करोगावरील सर्व उपचार राज्य सरकार मोफत करणार असल्याचे जाहीर केले. कोणत्याही रुग्णालयात महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या तपासासाठी नोंदणी शुल्क (केस पेपर) फी माफ केले आहे.स्तनाचा कर्करोग कसा ओळखाल? स्तनाचा कर्करोग प्राथमिक टप्प्यात असताना लक्षणे दिसून येतात; मात्र जसा हा कर्करोग शरीरात इतरत्र पसरतो त्यावेळी वजन कमी होणे, भूक मंदावणे, अशक्तपणा, थकवा ही लक्षणेही दिसून येतात. ही लक्षणे पुढील टप्प्यातली असल्याने कोणतीही गाठ स्तनात दिसून आली की तपासणी करून घेणे हितावह आहे. काळजी काय घ्याल? स्तनाच्या कर्करोगाला कोणताही ठोस प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध नाही. जीवनशैलीशी संबंधित आजार जसे की स्थूलता, व्यसनाधीनता, बैठ्या कामामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. निरोगी जीवनशैली अंगिकारण्याची काळजी घ्यायला हवी. तपासणी केव्हा कराल? लवकर निदान होण्यासाठी, पन्नाशीनंतर नियमितपणे मॅमोग्राफी स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे. खरे तर ३५ वय ओलांडलेल्या प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा ही चाचणी करणे गरजेचे आहे.निदान झाल्यास उपचार करणे सोपे स्तनाचा कर्करोग हा चार स्तरांपर्यंत पसरत जातो. पहिल्या दोन स्तरांवर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णावर उपचार करणे सोपे जाते. रुग्ण वाचू शकतो. तिसऱ्या, चौथ्या स्तरावर स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यास शस्त्रक्रिया, केमो थेरपी, रेडिएशन यानंतरही रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. आपण स्वत:ही तपासणी करू शकतो. यामुळे महिला, मुली यांनी न घाबरता स्तनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. नलिनी सिंग यांनी सांगितले.टॅग्स :कर्करोगcancer