hygienic habits for children to keep sickness away
मुलांना लावा या ५ चांगल्या सवयी, आजार राहील चार हात दूर By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 07:51 PM2018-02-20T19:51:35+5:302018-02-20T20:11:07+5:30Join usJoin usNext पालक म्हणून मुलांना वाढवताना आपल्याला बऱ्याच जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांना असणाऱ्या सवयींवरही लक्ष ठेवण्याची गरज असते. स्वच्छतेच्या सवयी मुलांना असल्या की त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत नाही. ते आजारी पडत नाहीत किंवा गचाळ राहत नाहीत. १) वेळोवेळी हात धुणे - मुलांना कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी हात धुण्यास सांगितले पाहिजे. हात न धुतल्यास जंतू हातामार्फत त्या पदार्थातून पोटात जाऊ शकतात, त्यामुळे पोटदुखी किंवा तशा इतर समस्या उद्भवू शकतात. २) तोंडाची स्वच्छता - सकाळी उठून व्यवस्थित ब्रश करणे ही सवय मुलांच्या दाताच्या तसेच तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसे न केल्यास मुलांचे दात किडु शकतात त्यामुळे दातांचं दुखणं हे वाढू शकतं. ३) पायांची निगा - शाळेतून अथवा खेळून आल्यावर व्यवस्थित हात, पाय धुवून घरात वावरल्यास आरोग्य सुदृढ राहते. लहान मुलांच्या पायांवर फार जास्त जंतू असतात कारण ते बऱ्याच ठिकाणी फिरुन आलेले असतात. त्यामुळे पायाची निगा राखणं महत्वाचं असतं. ४) अंघोळ - प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला रोज सकाळी आणि गरजेचं असल्यास संध्याकाळी अंघोळीची सवय लावणं गरजेचं आहे. कारण रोज नियमितपणे अंघोळ केल्यास जंतूंचा संसर्ग होत नाही व अनेक आजारांना दूर ठेवता येतं. शरीर आणि मन स्वच्छ राहतं आणि ताजं-तवानं वाटतं. ५) शौचाच्या सवयी - पालकांनी मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शौचाची सवय लावणं खूप गरजेचं आहे. शौचाहून आल्यावर नियमितपणे हात व पाय धुण्यास सांगा. त्यामुळे तुमचं मूल नेहमी तंदुरूस्त राहिल आणि आजारांपासून दूर राहील. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips