Hypertension best breakfast options to control high blood pressure
बीपीच्या समस्यांना लांब ठेवतील नाष्त्यातील हे पदार्थ; अचानक बीपी हाय होण्याचा धोका होईल कमी By manali.bagul | Published: February 3, 2021 11:38 AM2021-02-03T11:38:04+5:302021-02-03T11:51:28+5:30Join usJoin usNext हापयपर टेंशन आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणं सामान्य आहे. जास्तीत जास्त लोक सध्याच्या जीवनशैलीत बीपी नॉर्मल ठेवण्यासाठी गोळ्या किंवा औषध घेतात. तुम्ही तुमच्या आहारात बदल केला तर हा धोका टाळता येऊ शकतो. दिवसाच्या सुरूवातीचा नाष्ता तुम्ही जर संतुलित घेतला तर ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला असा नाष्ता सांगणार आहोत. ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या कमी करता येऊ शकते. ओट्स- दिवसाची सुरूवात ओट्सच्या सेवनानं केल्यास यापेक्षा उत्तम काहीही ठरणार नाही. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे रक्तदाब निंत्रणात राहण्यास मदत होते. हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी कमी प्रमाणत सोडियमयुक्त आहार घ्यायला हवा. याशिवाय ओट्स बनवायलाही खूप सोपे असतात. त्यामुळे वेळही वाचतो. फळं आणि दही- हाय बीपी असलेल्यांनी नियमितपणे दह्याचे सेवन करायला हवं. अनेक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार दही हायपर टेंशनसाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. नट्स, बीया आणि लो फॅट उत्पादनं- डेअरी एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी आहारात पोटॅशियमचा समावेश करायला हवा. बीया, नट्स यामध्ये मोठया प्रमाणावर पोटॅशियम असते. त्यामुळे तुम्ही नाष्त्यासाठी हा पर्याय निवडणं कधीही उत्तम ठरेल. अंडी- जास्तीत जास्त लोक ब्रेकफास्टमध्ये अंडी खाण्याला प्राधान्य देतात. अंडी हा प्रोटिन्सचा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे. ब्रेकफास्टमध्ये अंडी खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. तुम्ही उकडलेली अंडी किंवा विविध भाज्यांचा समावेश असलेलं ऑमलेट खाऊ शकता. केळी आणि बेरीज- केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. केळी खाल्यानंतर बराचवेळ भूक लागत नाही. रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. तुम्ही केळ्यासह बेरीजही खाऊ शकता त्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन्स असतात. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्नहृदयविकाराचा झटकाहृदयरोगHealth TipsHealthfoodHeart AttackHeart Disease