important Faq Answered Related To Corona Vaccination
Corona Vaccination: कोरोना लसीबद्दल तुमच्याही मनात आहेत प्रश्न?; जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 01:55 PM2021-01-16T13:55:58+5:302021-01-16T14:00:07+5:30Join usJoin usNext देशात कोरोना संकटाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानास प्रारंभ केला. कोरोना लसीकरणाबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपल्याला लस कधी, कशी, केव्हा मिळणार, कोणाला लस मिळणार नाही, असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी... प्रश्न- आजपासून कोणाला लस दिली जाणार? उत्तर- आज आणि पुढील तीन सेशन्समध्ये केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. प्रश्न- पहिल्या टप्प्यातील लसीकरणात वयाची मर्यादा असणार का? उत्तर- १८ वर्षांच्या वरील व्यक्तींनाच कोरोना लस टोचली जाईल. प्रश्न- मला लस कधी मिळणार, याची माहिती कशी मिळेल? उत्तर- कोविन सॉफ्टवेअरवरून मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल. पहिल्या दोन टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि आजारांचा सामना करणाऱ्यांना लस दिली जाईल. प्रश्न- कुठे नोंदणी करावी लागेल का? उत्तर- लसीकरण करून घ्यायचं असल्यास को-विन (co-win) ऍपवर स्वत:ची नोंदणी करून घ्यावी लागेल. प्रश्न- लसीकरणासाठी पैसे मोजावे लागतील की ते नि:शुल्क असेल? उत्तर- पहिल्या टप्प्यातलं लसीकरण मोफत आहे. त्यानंतरचं लसीकरण मोफत असेल की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रश्न- खासगी पद्धतीनं लसीकरणाचा पर्याय आहे का? उत्तर- सध्या लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यासाठीचा परवाना मिळाल्यावर सरकारच्या मंजुरीनंतर बाजारात लस उपलब्ध होईल. पुढील दोन-तीन महिन्यात लस बाजारात उपलब्ध होऊ शकते किंवा यापेक्षा जास्त वेळदेखील लागू शकतो. प्रश्न- लहान मुलांनादेखील लस दिली जाईल? उत्तर- कोरोना लसींची चाचणी १८ वर्षांवरील व्यक्तींवरच झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना आता लस दिली जाणार नाही. प्रश्न- पुढील डोज कधी मिळणार? उत्तर- पुढील डोज सरकारकडून २८ दिवसांनंतर दिला जाईल. दोन डोजमध्ये ४ ते ६ आठवड्यांचं अंतर असावं, असं कोविशील्ड लस तयार करणाऱ्या सीरमनं म्हटलं आहे. प्रश्न- कोणत्या कंपनीची लस घ्यायची ते मी निवडू शकतो/शकते का? उत्तर- सध्या तरी हा पर्याय उपलब्ध नाही. बाजारात लस उपलब्ध झाल्यावर नागरिकांकडे हा पर्याय असू शकेल.टॅग्स :कोरोनाची लसCorona vaccine