improve digestion system after age of 30 years do follow healthy fitness tips to immune naturally
तिशीनंतर पचनाचे, पित्ताचे त्रास सुरू झालेत? फॉलो करा 'या' 5 सोप्या घरगुती टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:17 AM2023-09-01T10:17:34+5:302023-09-01T10:25:22+5:30Join usJoin usNext खूप वेळ बसून काम करत असाल तर या गोष्टींचा काळजी घ्या improve digestion system, follow 5 tips: उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली पचनशक्ती. खाल्लेलं पचेल तेव्हाच शरीराची क्रिया सुरळीत सुरू राहिल. पचनशक्तीवर परिणाम झाला तर त्याचा परिणाम पोटावर आणि पर्यायाने शरीरावर होतो, ज्यामुळे नंतर खूप त्रास होऊ शकतो. सहसा तिशीनंतर खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात, त्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध, पोट फुगणे, पित्ताचा त्रास वाढणे, अशा काही गोष्टी जाणवू शकतात. पचनक्रिया संथ झाल्याने हा प्रकार घडत असतो. अशा परिस्थितीत आपली पचन शक्ती कशी वाढवाल याबद्दल जाणून घेऊया.१. सर्व प्रकारचे पदार्थ खा- बरेच लोक दररोज एकाच प्रकारचे अन्न खातात. याचा तुमच्या पचनावर नकारात्मक परिणाम होतो. सर्व प्रकारचे पदार्थ सेवन केले पाहिजेत. यातून शरीराला वेगवेगळ्या प्रकारची आवश्यक पोषक तत्व मिळतात, ज्यामुळे पोट आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.२. फायबरयुक्त पदार्थ आहारात असावेत- आहारातील फायबर हे चांगल्या पचनासाठी फायदेशीर आहे. विरघळणारे फायबर पाणी शोषून घेते आणि तुमचे पोट साफ करण्याच्या प्रभावी ठरते. फायबर पोटात टूथब्रशसारखे कार्य करते, जे आपल्या पचनसंस्थेला सर्व हालचाली सुरळीत ठेवण्यास मदत करते. संपूर्ण धान्य, नट्स आणि बिया हे फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. फळे आणि भाज्यांमध्ये फायबर असतात.३. हेल्थी फॅट्स शरीरासाठी महत्त्वाचे- चांगल्या पचनासाठी हेल्थी फॅट्सची आवश्यकता असते. यामुळे काही पोषक घटकांचे मूल्य वाढते. जीवनसत्त्व ए, डी, ई आणि के याचे पोषक मूल्य यामुळे वाढते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे अल्सरेटिव्ह कोलायटिसचा धोका कमी होतो. यासाठी फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, नट्स विशेषतः अक्रोड आणि तत्सम कठीण कवच असलेले नट्स खावेत तसेच मासेही खावेत.४. पाणी पित राहा आणि हायड्रेटेड राहा- पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे कमी सेवन बद्धकोष्ठतेशी संबंधित आहे. दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. जर तुम्ही उष्ण वातावरणात असाल तर प्रमाण वाढवा. पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही हर्बल टी आणि नॉन-कॅफिनयुक्त पेये प्यावीत. फळ-भाज्यांचे रस आणि सॅलडचे सेवन करावे.५. मानसिक तणाव घेणे टाळायचा प्रयत्न करा- तणावामुळे तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे पोटातील अल्सर, अतिसार, बद्धकोष्ठतेशी जोडलेले आहे. स्ट्रेस हार्मोन्सचा थेट पचनावर परिणाम होतो. तणाव दूर करण्यासाठी सर्व वाजवी उपायांचे अनुसरण करा. या व्यतिरिक्त सावकाश आणि वेळेवर अन्न नीट चावून खा. रोज हलका व्यायाम करा. पोटाची भूक समजून घ्या आणि त्यानुसार खा. तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळा आणि दररोज पुरेशी झोप घ्या.टॅग्स :हेल्थ टिप्सपाणीफळेमानसिक आरोग्यHealth TipsWaterfruitsMental Health Tips