संकटं संपता संपेना! कोरोना पाठोपाठ 'या' 3 आजारांनी वाढवलं टेन्शन; जगासमोर नवं आव्हान By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 03:11 PM 2022-05-23T15:11:37+5:30 2022-05-23T15:18:43+5:30
कोरोनाच्या विळख्यातून संपूर्ण जग अजून सावरले नव्हते, की मंकीपॉक्स, हेपेटायटिस आणि टोमॅटो फ्लू या तीन नवीन आजारांनीही जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. चीनमधून उद्भवलेल्या या व्हायरसने तत्काळ संपूर्ण जगाला विळखा घातला आणि लाखो लोकांचा बळी घेतला. लस आल्यानंतर मृतांचा आकडा थोडा कमी झाला असला तरी, कोरोना संपलेला नाही.
कोरोनाचा वेग आता पूर्वीच्या तुलनेत थोडा कमी झाला आहे. काही देशांमध्ये अजुनही मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या विळख्यातून संपूर्ण जग अजून सावरले नव्हते, की मंकीपॉक्स, हेपेटायटिस आणि टोमॅटो फ्लू या तीन नवीन आजारांनीही जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अहवाल दिला आहे की मंकीपॉक्सचा जगातील 12 देशांमध्ये 92 लोकांना संसर्ग केला आहे. या तीन नवीन आजारांनी कोणत्या देशांमध्ये दार ठोठावले आहे आणि त्यांच्या संसर्गाने किती लोक प्रभावित झाले आहेत हे जाणून घेऊया.
कोरोना पाठोपाठ आलेल्या या आजारांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
टोमॅटो फ्लू टोमॅटो फ्लू हे व्हायरल इन्फेक्शन आहे. हा व्हायरस प्रामुख्याने 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रभावित करतो. याच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे.
जेव्हा त्याचा संसर्ग लहान मुलांना होतो तेव्हा संसर्ग झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोसारखे लाल रंगाचे पुरळ उठतात. या दाण्यांमध्ये खाज सुटते, ज्यामुळे खरचटून त्यांची जळजळ होते. बाधित बालकालाही खूप ताप येतो.
टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या मुलांच्या शरीरात आणि सांधेदुखीचीही तक्रार आहे. हा विषाणू त्याच्या संसर्गाने मुलांची पचनशक्ती बिघडवतो, त्यामुळे मुले डिहायड्रेशनची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.
हेपेटायटीस गेल्या काही दिवसांपासून जगभरातील मुलांमध्ये अनएक्सप्लेंड एक्यूट हेपेटायटीसची प्रकरणे दिसून येत आहेत. अशा प्रकरणांची संख्या अचानक का वाढू लागली हे संशोधकांना समजू लागले आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) आणि यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीसह प्रमुख आरोग्य अधिकार्यांनी या आजाराबाबत इशारा जारी केला आहे, कारण जगभरातील देशांमध्ये प्रकरणे वाढत आहेत.
मंकीपॉक्स मंकीपॉक्स हे एक दुर्मिळ व्हायरल इन्फेक्शन आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये ते पहिल्यांदा सापडले होते. मंकीपॉक्सच्या संसर्गाचे पहिले प्रकरण 1970 मध्ये नोंदवले गेले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रविवारी मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बायडेन यांनी रविवारी सांगितले की युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सच्या अलीकडील प्रकरणांबद्दल काळजी करण्याची गरज आहे.
दक्षिण कोरियातील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना बायडेन यांनी प्रथमच या आजारावर जाहीरपणे भाष्य केले. हा संसर्ग पसरला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं देखील बाय़डेन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.