Infants crying too much is bad for health
...म्हणून जास्त रडणं बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक! By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 08:01 PM2019-02-22T20:01:49+5:302019-02-22T20:07:00+5:30Join usJoin usNext एखादं लहान मुल जेव्हा रडतं तेव्हा हातातील कामं सोडून त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा असं होतं की, लहान मुल शांत होण्याऐवजी अजून रडू लागतं. त्यासाठी आवश्यक आहे की, आपल्याला त्याच्या रडण्याचं योग्य कारणं माहीत असलं पाहिजे. बाळ रडू लागलं की, भूक लागल्यामुळे ते रडतयं असा अनेकांचा समज होतो. पण त्याव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही ती खूप रडतात. पण तुम्हाला माहीत आहे का? जास्त रडणं मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जाणून घेऊया मुलांच्या रडण्याची आणखी काय कारणं आहेत त्याबाबत...1 ते 3 तास रडणं सामान्य बाळाचं एका दिवसामध्ये 1 ते 3 तास रडणं सामान्य गोष्ट आहे. त्यासाठी घाबरण्याची अजिबात गरज नाही. परंतु जर बाळ यापेक्षा जास्त रडलं तर त्याचं आरोग्य आणि ब्रेनसाठी धोकादायक ठरू शकतं. तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की, बाळ नक्की का रडतयं आणि त्यावर योग्य उपाय करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणं सोपं होतं. झोपेची कमी साधारणतः असं म्हटलं जातं की, बाळ त्याला हवं तेव्हा, कुठेही झोपू शकतं. पण हा गैरसमज आहे. खरं तर त्याला झोपण्यापूर्वी खूप समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना सतत अस्वस्थ वाटत राहतं. ते मोठ्या माणसांप्रमाणे अगदी सहज झोपत नाहीत. याव्यतिरिक्त अतिरिक्त थकवा असल्यामुळे ते कंटाळलेले असतात. झोपण्यापूर्वी चिडचिड करत असतात. त्यामुळे ते रडत असतात. भूक लागल्यावर वास्तवात बाळाला जेव्हा भूक लागते. तेव्हा ते रडून सांगतात. परंतु तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला त्याला भूक लागल्याचं आधीच समजू शकता. बाळ भूक लागल्यानंतर आपल्या शारीरिक हालचालींमधून सांगण्याचा प्रयत्न करतं. या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला रडण्यापासून थांबवू शकता. पोटाच्या समस्यांमुळे पोटाच्या वेदना, गॅस इत्यादी समस्या झाल्यास बाळ रडतं. जर तुमचंही बाळ दूध प्यायल्यानंतरही रडत असेल तर त्याला कदाचित पोटाच्या समस्याचा सामान करावा लागत असण्याची शक्यता असते. अनेकदा पोटदुखीमुळेही बाळांना त्रास होत असतो. टॅग्स :रिलेशनशिपहेल्थ टिप्सपालकत्वRelationship TipsHealth TipsParenting Tips