Is it better to stand at work or sit?
एकाच जागेवर बसून काम करता?, असा काढा स्वतःसाठी वेळ By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 07:02 PM2019-02-14T19:02:52+5:302019-02-14T19:07:06+5:30Join usJoin usNext सलग एकाच जागेवर बसून राहून काम करत असाल, तर कामातून स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला शिका. वेळ काढून ऑफिसमध्ये थोड्या वेळासाठी पाय मोकळे करा. शक्य असल्यास जिण्यांचा वापर करा. यामुळे तुमच्या हृदयाचे कार्य आणि रक्ताभिसरणदेखील चांगल्या पद्धतीने होईल आणि अनेक आजारांपासून तुमची सुटका होईल. काही वेळेस उभे राहून काम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळेल. पण, समजा तुम्हाला खुर्चीवरच बसून राहायचे आहे तर योग्य स्थितीत बसा. पाठीला बाक काढून किंवा एका बाजूने झुकून काम करणं टाळा. आपल्या जागेवरच बसून जेवण्याऐवजी कॅन्टीन किंवा लंच रूममध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. यामुळे तुमचा थोडासा वॉकदेखील होईल. काम करताना अधेमधे मान आणि खांद्याच्या हालचाल होऊ द्या. याशिवाय, ऑफिसमधून बाहेर पडून अंगावर थोडेसे ऊन घ्या. हात नसलेल्या खुर्चीचा वापर करावा. कारण हात असलेल्या खुर्च्यांमुळे हात अगदीच सरळ स्थितीत राहतात.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips