This Jeera Ginger Drink Promises To Cut Tummy Flab In 10 Days
पोट कमी करायचंय? जिरं, आल्याचा रस प्या अन् 10 दिवसात कमाल पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 02:21 PM2019-06-25T14:21:49+5:302019-06-25T18:09:14+5:30Join usJoin usNext पोटाचा घेर कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. शरीर सुडौल असावं अशी कित्येकांची इच्छा असते. यासाठी जिरं आणि आल्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. आलं पचनात महत्त्वाची भूमिका बजावतं. आलं उष्णता निर्माण करत असल्यानं पचनाची प्रक्रिया सुलभ होते. जिऱ्यात पोटॅशियम, लोह यांचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि केदेखील असतं. यामुळे फॅट्स आणि शरीरास हानीकारक असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. कसा तयार कराल रस- एक चमचा जिरं (संपूर्ण किंवा पावडर) आणि आलं घ्या. हे दोन्ही पदार्थ 500 मिली पाण्यात टाका. त्यानंतर पाणी उकळा. पाणी 250 मिली होईल तोपर्यंत उकळवा. जिरं आणि आल्याचा रस प्यायल्यास आणि दररोज 45 मिनिटं व्यायाम केल्यास पोटाचा घेर कमी होऊ शकतो. जिरं आणि आल्याचा रस प्यायल्यानं पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे दिवसभरात जास्त कॅलरी बर्न होतात. यामुळे भूकदेखील नियंत्रणात राहते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips