Kappa Variant : डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवा 'कप्पा व्हेरिएंट', जाणून घ्या लक्षणे आणि कसं पडलं याचं नाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 05:23 PM2021-07-09T17:23:38+5:302021-07-09T17:36:55+5:30

Corona Virus Kappa Variant : डेल्टा प्लस प्रमाणे कप्पा व्हेरिएंटलाही चिंताजनक म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट संपलेली नसताना कोरोनाचा (Coronavirus) एक नवा व्हेरिएंट उत्तर प्रदेशात समोर आला आहे. ज्यामुळे डॉक्टर चिंतेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Corona Delta Variant) चिंतेचं कारण बनला आहे. अशात आता कोरोनाच्या नव्या कप्पा व्हेरिएंटने (Kappa Variant ) डोकं वर काढलं आहे.

देवरिया आणि गोरखपूरमध्ये डेल्टा प्लस स्ट्रेनचे दोन रूग्ण आढळून आले आहे. त्यानंतर आता संत कबीर नगर मध्ये आणखी कप्पा स्ट्रेनने पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. यातील ६६ वर्षीय एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

देवरिया आणि गोरखपूरमध्ये डेल्टा प्लस स्ट्रेनचे दोन रूग्ण आढळून आले आहे. त्यानंतर आता संत कबीर नगरमध्ये कप्पा स्ट्रेनने पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. यातील ६६ वर्षीय एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जीनोम अनुक्रमण अभ्यासादरम्यान या स्ट्रेनची माहिती मिळाली होती. त्याचा नमूना १३ जूनला नियमितपणे जमा करण्यात आला होता आणि सीएसआयआरच्या इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅन्ड इंटीग्रेटीव बायोलॉजी नवी दिल्ली येथे पाठवण्यात आला होता.

डेल्टा प्लस प्रमाणे कप्पा व्हेरिएंटलाही चिंताजनक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. या आठवड्यात उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच दोन डेल्टा प्लस स्ट्रेन केसेस नोंदवण्यात आल्या.

तज्ज्ञांनुसार कप्पा व्हेरिएंटचं पॅंगो वंशाशी नातं आहे. या वंशाला १.६१७ नावाचे ओळखलं जातं आणि याच्या तीन उपवर्गापैकी एक कप्पा व्हेरिएंट आहे. कप्पा व्हेरिएंटला B.1.617.1 नाव देण्यात आलं आहे. जो भारतात पहिल्यांदा डिसेंबर २०२० मध्ये आढळून आला होता.

तज्ज्ञांचं मत आहे की, E484Q आणि E484K व्हेरिएंटमुळे कप्पा व्हेरिएंटचं रूप समोर आलं. असं म्हटलं जात आहे की या म्यूटेशनमध्ये L452R म्यूटेशनचाही हात आहे. ज्यामुळे आपलं इम्यून सिस्टम कमजोर पडतं.

काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घोषणा केली होती की, आता कोविड-१९ च्या नव्या स्ट्रेनचं नाव ग्रीक अल्फाबेटिकल लेबल्सच्या नावावरून ठेवलं जाईल.

अशात ज्या स्ट्रेनचं मूळ भारत असेल त्यांचं नाव डेल्टा आणि कप्पा ठेवलं जाईल. कप्पा व्हेरिएंट सर्वातआधी भारतात डिसेंबर २०२० मध्ये आढळून आला होता. त्यामुळे त्याचं नाव कप्पा ठेवलं आहे.

तज्ज्ञांनुसार, कोरोना व्हायरसच्या कप्पा व्हेरिएंटने पीडित लोकांना खोकला, ताप, घशात खवखव यांसारखी प्राथमिक लक्षणे दिसू शकतात. तेच माइल्ड आणि गंभीर लक्षणे कोरोना व्हायरसच्या इतर म्यूटेंट्सच्या लक्षणांसारखेच असतील.

या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी आधीप्रमाणेच मास्क लावणे, सतत हात धुणे, गर्दीत जाणं टाळणे हेच उपाय करायचे आहेत. तसेच इम्यूनिटीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जर लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read in English