बापरे! 'ही' 4 लक्षणं सांगतात किडनी होतेय खराब; त्वचेवर बदल दिसताच व्हा सावध, करू नका दुर्लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 02:56 PM 2022-02-21T14:56:27+5:30 2022-02-21T15:13:29+5:30
Kidney Disease Symptoms : योग्य काळजी न घेतल्यास किडनी निकामी (Kidney failure) होण्याचा आणि इतरही आजारांचा धोका वाढतो. किडनी आपल्या शरीरातील साफसफाईचं काम करते. ही उत्सर्जन प्रणालीचा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. आपल्या दोन्ही किडनीमध्ये दोन लहान फिल्टर असतात, ज्यांना नेफ्रॉन म्हणतात. ते रक्त स्वच्छ करतात.
योग्य काळजी न घेतल्यास किडनी निकामी (Kidney failure) होण्याचा आणि इतरही आजारांचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, किडनी निकामी होण्याची इतकी सौम्य असतात की, हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतांश लोकांना काही फरक जाणवत नाही.
दुखापतीमुळे, उच्च रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे किडनी खराब झाल्यास ती शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाहीत.ज्यामुळे विषारी घटक तयार होतात. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाहीत आणि विषारी पदार्थ जमा होऊ शकतात.
वारंवार लघवी होणं मायोक्लिनिकच्या मते, वारंवार लघवी होणं हे देखील किडनी निकामी होण्याचं लक्षण आहे. एखादी सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून 6-10 वेळा लघवी करते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त वेळा लघवी करावी लागत असेल तर, काळजी घ्या.
किडनीच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप जास्त वेळा किंवा खूप कमी वेळा लघवी करण्याची इच्छा होते. या दोन्ही गोष्टी किडनीला नुकसान पोहोचवतात. काही वेळा काही लोकांच्या लघवीतून रक्तही येऊ लागतं.
अशक्तपणा आणि थकल्यासारखं वाटणं मायोक्लिनिक सांगतं की, सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवणं ही किडनीच्या समस्येची सुरुवातीची लक्षणं आहेत. किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो.
त्वचेचा कोरडेपणा आणि खाज सुटणं त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणं हे देखील किडनी डिसऑर्डरचं मुख्य लक्षण आहे. जेव्हा किडनी शरीरातील विषारी द्रव्यं काढून टाकण्यास सक्षम नसतात, तेव्हा असं होतं. नंतर हे विषारी पदार्थ रक्तामध्ये जमा होऊ लागतात,.
ज्यामुळे त्वचेला खाज सुटणं, दुर्गंधीसह कोरडेपणा येणं या समस्या येता असतात. तुम्हालाही ही लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळीच योग्य ते उपचार घ्या अन्यथा हे महागात पडू शकतं.
हात आणि पाय सुजणं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, किडनी शरीरातील अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. जेव्हा किडनी योग्यरित्या काम करणं थांबवतं, तेव्हा सोडियम शरीरात जमा होऊ लागतो. यामुळं सूज येते. या स्थितीला एडिमा म्हणतात.
सामान्यतः टॉक्सिक किडनीमध्ये डोळे आणि चेहऱ्यावर सूज येणं दिसून येतं. परंतु त्याची लक्षणं हाता-पायांवर सर्वांत जास्त परिणाम करतात. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)