KINDER RECALLS CHOCOLATE EGGS AFTER SALMONELLA CASES
पालकांची चिंता वाढली! किंडर जॉयच्या उत्पादनामुळे मुलांना होतोय धोकादायक आजार By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 01:22 PM2022-04-06T13:22:09+5:302022-04-06T13:25:03+5:30Join usJoin usNext फेरेरो कंपनीनं परत मागवली उत्पादन; लहान मुलांसाठी ठरत होती धोकादायक जगभरातील लहान मुलांमध्ये किंडर जॉयची उत्पादनं लोकप्रिय आहेत. अनेक मुलं किंडर जॉयसाठी पालकांकडे हट्ट धरतात आणि पालकही त्यांचा हट्ट पुरवतात. किंडर जॉयचं उप्तादन करणाऱ्या फेरेरो कंपनीनं आपलं एक उत्पादन बाजारातून परत मागवलं आहे. उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित नसल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील खाद्य सुरक्षा यंत्रणा असलेल्या एफएसएनं ग्राहकांना किंडर जॉयच्या काही उत्पादनांचा वापर न करण्याचा सल्ला दिला. किंडरच्या उत्पादनांमुळे साल्मोनेलाचं संक्रमण होत असल्याचा संशय एफएसएला आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये आणि ब्रिटनमध्ये पसरणाऱ्या साल्मोनेला संक्रमणात संबंध असल्याचं UKHSA आणि युरोपीतील काही अन्य आरोग्य यंत्रणांच्या तपासात आढळून आलं आहे. फेरेरो कंपनीनं सतर्कता म्हणून बाजारातून आपलं उत्पादन मागे घेऊन तपास सुरू केलं आहे. मागे घेण्यात आलेलं उत्पादन एकाच कारखान्यात तयार करण्यात आलं आहे. किंडर सरप्राईजच्या काही बॅच मागे घेण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं. किंडर सरप्राईजची २० ग्रॅमची पाकिटं, ज्यांची वैधता ११ जुलै २०२२ ते ७ ऑक्टोबर २०२२ च्या दरम्यान आहे, त्या बॅच मागे घेण्यात आल्या आहेत. साल्मोनेलाचं संक्रमण कच्चं मांस, पार्श्चराईज न केलेलं दूध, अंडं, गोमांस आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांमधून होतं. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना साल्मोनेलाची लागण झाल्यास ती धोकादायक ठरू शकते. साल्मोनेलाची बाझा झाल्यास तिचा प्रभाव जवळपास ४ ते ७ दिवस असतो. पोटदुखी, उलटी, अतिसार, मळमळ, ताप, थंडी वाजणं, डोकेदुखी, शौचावाटे रक्त येणं ही साल्मोनेलाची लक्षणं आहेत.