चोरीचा मामला! काही लोकांना होते पुन्हा पुन्हा चोरी करण्याची इच्छा, काय आहे या अनोख्या आजाराचं कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 11:14 AM 2021-03-04T11:14:28+5:30 2021-03-04T11:26:31+5:30
Kleptomania छ चोरी करताना मानसिक अवस्था अशी होती की, ते स्वत:ला रोखूच शकत नव्हते. याला एक मानसिक आजार मानलं जातं. ज्यात डिप्रेशन आणि इतर लक्षणांसोबतच चोरी करण्याचंही एक लक्षण दिसतं. अनेकदा अशा केसेस समोर येतात की, ज्यात लोकांकडे सर्व सुविधा असतात, ते श्रीमंत असतात तरी छोट्या-मोठ्या चोरी करतात. अशा लोकांनीही चोरी करून हैराण केलं आहे जे लोक सामाजिक जबाबदारी असलेल्या मोठ्या पदांवर होते. पण अनेकदा असंही होतं की, खूपदा इच्छा असूनही लोक चोरी करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. हे त्यांच्यासाठी एखाद्या मजबूरीसारखं असतं. याचं कारण आपल्या मानसिक आजाराशी जोडलेलं आहे. चला जाणून घेऊ ते नेमकं काय आहे.
मुळात जे लोक चोरी करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. ते लोक अनेक चोरी केलेल्या वस्तू परत करतानाही आढळले आहेत. पण चोरी करताना मानसिक अवस्था असी होती की, ते स्वत:ला रोखूच शकत नव्हते. याला एक मानसिक आजार मानलं जातं. ज्यात डिप्रेशन आणि इतर लक्षणांसोबतच चोरी करण्याचंही एक लक्षण दिसतं.
IHBAS दिल्लीचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश यांनी आजतकसोबत बोलताना सांगितले की, या मानसिक आजाराला क्लेप्टोमेनिया असं म्हणतात. अशा रूग्णांना ओळखून त्यांच्यातील अपराधाची भावना चिकित्सेद्वारे दूर केली जाते.
याचा कायद्यापासून बचावासाठीही वापर केला जातो. सिंगापूर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमध्ये २०१० मध्ये एका वर्षात फॉरेन्सिक मनोरूग्ण मूल्यांकनच्या माध्यमातून चोरीच्या अपराध्यांच्या केस नोट्सच्या स्टटीमध्ये तीन रूग्ण आढळले. ज्यांना क्लेप्टोमेनिया आहे.
मनोविकार तज्ज्ञांनुसार, क्लेप्टोमेनियाने ग्रस्त रूग्णाच्या मेंदूत केमिकल इफेक्टमुळे एड्रिनलची लेव्हल वाढते. याने त्यांच्यात काही चोरी करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. असं करून त्यांना वाटत असतं की, त्यांच्या डिप्रेशन आणि तणावात कमतरता येईल.
मुळात ही स्थिती मेंदूच्या कंट्रोलमध्ये नसते. क्लेप्टोमेनियाने ग्रस्त व्यक्तीची मानसिक स्थिती वेगळ्याच आवेगात असते. आवेगात रूग्ण स्वत:ला इम्पल्सिव किंवा अत्याधिक हाय असल्याचं मानतो. त्यांची इच्छा असते की, त्यांनी चोरी करावी. आवेगाच्या दुसऱ्या स्तरावर ते चोरी करतात. तिसऱ्या स्तरावर रूग्णाला चोरी करून मनाला शांतता मिळते.
क्लेप्टोमेनियाची लक्षणे - ज्या वस्तूंची तुम्हाला गरज नाही अशा वस्तू चोरी करण्याचा मनात येत असलेला विचार न थांबवता येणे, वाढता तणाव, चिंता किंवा उत्तेजनेमुळे चोरीचा विचार येतो, चोरी करताना आनंद, दिलासा, संतुष्टी जाणवणे, चोरीनंतर अपराध केल्याची, पश्चाताप, घृणा, लाज आणि अटक होण्याची भीती वाटणे.
डॉ. ओमप्रकाश म्हणाले की, क्लेप्टोमेनिया होण्याचं कारण स्पष्ट नाही. तसेच हेही अजून स्पष्ट नाही की, कोणत्या निश्चित उपचाराने हे रोखलं जाऊ शकतं. चोरी करण्यात मजेची भावना आणि स्वत:ला रोखू न शकण्याची भावना अशी लक्षणे दिसताच तज्ज्ञांशी संपर्क साधणे आणि ही समस्या अधिक वाढण्याआधी उपचार घेतली तर मदत मिळेल.